जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Lucky Girls: खळी पडणाऱ्या मुलींच्याबाबतीत ही गोष्ट असते खास; गाल पाहून पण कळतं बरंच काही

Lucky Girls: खळी पडणाऱ्या मुलींच्याबाबतीत ही गोष्ट असते खास; गाल पाहून पण कळतं बरंच काही

Lucky Girls: खळी पडणाऱ्या मुलींच्याबाबतीत ही गोष्ट असते खास; गाल पाहून पण कळतं बरंच काही

प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना वेगळी असते आणि त्यावर त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य अवलंबून असते. गालावर पडणाऱ्या खळीच्याबाबतीतही असे सांगितले जाते की,

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 मे : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच सामुद्रिकशास्त्र देखील माणसाचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती देते. ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या राशीच्या आधारावर याची गणना होते. तर सामुद्रिक शास्त्र व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांचा आकार, रंग, शरीराच्या खुणा इत्यादींच्या आधारे ही गणना करते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना वेगळी असते आणि त्यावर त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य अवलंबून (Lucky Girls) असते. आज आपण अशा मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या गालावर खळी पडते. मुलींच्या गालावर पडणारे डिंपल त्यांच्या चेहऱ्याचं सौंदर्य आणखी वाढवतात. सामुद्रिकशास्त्रात याच्या आधारेच व्यक्तीचे भविष्य, आवडी-निवडी जाणून घेता येते. गालांच्या टेक्सचरच्या आधारे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो हे जाणून घेऊया. गालांच्या रचनेवरून व्यक्तीचा स्वभाव जाणून घ्या सामुद्रिकशास्त्रात असे म्हटले आहे की, ज्या मुलींच्या गालावर डिंपल्स असतात, त्यांची आर्थिक स्थिती इतर मुलींच्या तुलनेत चांगली असते. या मुलींना आयुष्यात खूप आनंद मिळतो. पैसा कधीही कमी पडत नसतो. खुल्या हाताने खर्च करतात. तसेच या मुलींचे आयुष्य लग्नानंतरही आनंदी राहते. गालावर काळे तीळ असणाऱ्या मुलींना खूप भाग्यवान समजले जाते. जीवनातील प्रत्येक कार्यात त्यांना यश मिळतं. तेच पुरुषांच्या गालावर काळे तीळ असणे शुभ मानले जात नाही. सामुद्रिशास्त्रात हे अशुभ मानले जाते. हे वाचा -  साडेसाती नसली तरी या राशींमागे अडचकी; शनीच्या राशी बदलानंतर सावध राहावं सामुद्रिक शास्त्रानुसार गुलाबी आणि गुबगुबीत गाल असणारे लोकही भाग्यवान असतात. आनंदी जीवन जगतात. हे लोक जे काही काम करतात त्यात यश मिळते. तसेच हे लोक एखादे काम पूर्ण करूनच श्वास घेतात. हे वाचा -  सकाळी उठल्याबरोबर कधीही बघायच्या नसतात या गोष्टी; सगळा दिवस जातो खराब ज्या लोकांचे गाल खोलगट किंवा खाली बसलेले असतात, त्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की या लोकांना कौटुंबिक सुख मिळत नाही. ते या बाबतीत कच्चे राहतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामुद्रिक शास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात