मुंबई, 07 मे : मानवी जीवनावर नवग्रह, राशी आणि नक्षत्रं अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करतात, असं ज्योतिषशास्त्र (Jyotish shastra) सांगतं. त्यामुळे ग्रहांचं राशिपरिवर्तन (Shani Transit) हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं ठरतं. नवग्रहांपैकी शनी (Saturn) हा अत्यंत कठोर ग्रह मानला जातो. शनी आणि साडेसाती (Sade Sati) ही नावं उच्चारलं तरी अनेकांना भीती वाटते. कारण साडेसाती म्हणजे संकटकाळ असा समज रूढ आहे. 29 एप्रिल 2022 रोजी शनीने कुंभ (Aquarius) या स्वराशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे धनू राशीच्या व्यक्तींची साडेसातीपासून सुटका झाली असून, मीन राशीच्या व्यक्तींना साडेसाती सुरू झाली आहे. सध्या मकर, कुंभ आणि मीन या राशींना साडेसाती सुरू आहे. तसंच शनीच्या या राशिपरिवर्तनामुळे कर्क (Cancer) आणि वृश्चिक (Scorpion) या राशींना शनीची अडीचकी (Dhaiyaa) सुरू झाली आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना ही अडीच वर्षं प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे.
29 एप्रिल 2022 रोजी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. याचा परिणाम 12 राशींवर दिसून येऊ लागला आहे. सध्या मकर, कुंभ, मीन या राशींना साडेसाती सुरू असून, कर्क आणि वृश्चिक या राशींना अडीचकी सुरू आहे. याचा प्रतिकूल परिणाम या दोन राशींच्या व्यक्तींना दीर्घ काळ जाणवण्याची शक्यता आहे.
हे वाचा - दुसऱ्यांच्या या 6 गोष्टी कधी चुकूनही वापरू नका, वास्तुशास्त्रानुसार विचित्र त्रास वाढू लागतात
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी हा कर्मानुसार फळ देणारा ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींचं कर्म चांगलं आहे आणि कुंडलीतला शनी प्रबळ आहे, त्यांना साडेसाती आणि अडीचकीचा त्रास तुलनेनं कमी होतो. त्यामुळे साडेसाती किंवा अडीचकीच्या कालावधीत सत्कर्मावर भर देणं गरजेचं आहे. या कालावधीत असहाय्य, महिला किंवा वृद्ध व्यक्तींचा अपमान करू नये, त्यांना सर्वतोपरी मदत करावी, असं जाणकार सांगतात.
कर्क : शनीने कुंभ राशीत प्रवेश करताच, कर्क राशीला अडीचकी सुरू झाली आहे. याचा कालावधी अडीच वर्षं असेल. या कालावधीत शनीची पूर्ण नजर कर्क राशीच्या व्यक्तींवर असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. करिअर, शिक्षणात अडचणी येऊ शकतात. धनहानी होऊ शकते, खर्च वाढू शकतात. आजार उद्भवू शकतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
हे वाचा - Planet Transits in May: 5 दिवसात सुरू होतायत या राशींचे सोनेरी दिवस; नोकरी-धंद्यात मिळतील आनंदी वार्ता
वृश्चिक : शनीच्या राशिपरिवर्तनामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अडीचकी सुरू झाली आहे. आगामी अडीच वर्षं या व्यक्तींसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. या कालावधीत शनी आर्थिक नुकसान, आजारपण, अपमानजनक वागणूक आदी फळं देत असतो. तसंच प्रगतीत अडथळे येणं, नात्यांमध्ये कटुता निर्माण होणं, वारंवार चिडचिड होणं, या गोष्टीही दिसून येतात. त्यामुळे या काळात धैर्य ठेवणं आवश्यक आहे.
(सूचना - हा लेख ज्योतिषशास्त्राच्या सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.