मुंबई, 17 फेब्रुवारी : आपल्या जोडीदारासोबत (Partner) शारीरिक संबंध (Sexual Relationship) ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, हे अनेक रिसर्च आणि रिपोर्ट्समध्ये दिसून आले आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुमच्या पार्टनरसोबत न्यूड स्लीपिंगचेही (Nude Sleeping) आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. अर्थात हे वाचायला किंवा ऐकायला विचित्र वाटेल, पण हे खरे आहे की, तुमच्या जोडीदारासोबत नग्न झोपण्याचे काय फायदे आहेत, यावर आतापर्यंत जगभरात अनेक संशोधने झाली आहेत. चला आता नग्न झोपण्याचे फायदे जाणून घेऊया. कॉर्टिसोल हार्मोनची पातळी संतुलित राहते लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, रात्री दोन वाजल्यानंतर शरीरातील कोर्टिसोलची पातळी लक्षणीयरीत्या वाढते. परंतु, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नग्न झोपलात तर शरीरातील कोर्टिसोलची पातळी नियंत्रित राहते. रात्री कपड्यांशिवाय झोपल्याने कॉर्टिसोल स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते, त्यामुळे पोटात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. याने शरीरातील कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते. चांगली झोप घेतल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते जोडीदारासोबत नग्न झोपल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. रात्री शरीराचे तापमान नियंत्रित ठेवल्यास अनेक शारीरिक व्याधी दूर होतात. यासोबतच नग्न झोपल्याने दोघांनाही चांगली झोप लागते आणि झोप न येण्याची समस्याही दूर होते. त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आणि गाढ झोपेसाठी नग्न झोपणे फायदेशीर ठरते. संशोधन अहवालानुसार, असेही दिसून आले आहे की असे लोक अधिक निरोगी असतात आणि त्यांच्यात तणाव कमी असतो. लैंगिक संबंध सुधारण्यासाठी करा Kegel Exercises, महिला-पुरुष दोघांसाठी फायदेशीर लैंगिक जीवन सुधारते न्यूड झोपेमुळे पार्टनरसोबतचे सेक्स लाईफही चांगले राहते. उत्तम परस्पर समन्वयामुळे कौटुंबिक जीवनही यशस्वी होते. नग्न झोपेमुळे त्वचेला त्वचेचा स्पर्श होतो तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिनची पातळी देखील वाढते, ज्यामुळे शारीरिक संबंध पूर्वीपेक्षा अधिक सुधारतात. मधुमेहाचा धोका कमी होतो जे लोक नग्न झोपतात, त्यांच्या शरीरात मधुमेहाचा धोकाही कमी असतो. त्याचवेळी, बेडरूमच्या तापमानाचा देखील लठ्ठपणावर परिणाम होतो. नग्न होऊन झोपल्याने ओव्हरहाटिंगची समस्याही टाळता येते. तारुण्यासोबत सौंदर्यातही भर जर तुम्हाला अधिक सुंदर आणि तरुण व्हायचे असेल तर झोपताना कधीही कपडे घालू नका. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नग्न झोपलात तर सौंदर्य कायम राहते. वय वाढल्यानंतरही तुम्ही स्वत:ला तरूण अनुभवाल. याशिवाय प्रत्येकाची अशी इच्छा असते की, दिवसभराच्या कामानंतर तो झोपताच त्याचा थकवा निघून जातो. अशा परिस्थितीत लोकांना चांगली झोपही अपेक्षित असते. तुम्हालाही तुमचा थकवा आणि सर्व प्रकारचा ताण एका चुटकीसरशी दूर करायचा असेल, तर नग्न झोपणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अधिक फायदेशीर आहे. News18 वरील आरोग्यविषयक लेख myUpchar.com द्वारे लिहिलेले आहेत. myUpchar हे आरोग्य बातम्यांचे देशातील पहिले आणि प्रमुख माध्यम आहे. myUpchar मध्ये डॉक्टरांसह संशोधक आणि पत्रकार तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित सर्व माहिती घेऊन येत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.