अरे बापरे! बिस्कीट खाताच मॉडेलला मारला लकवा; आता झाली भयंकर अवस्था

अरे बापरे! बिस्कीट खाताच मॉडेलला मारला लकवा; आता झाली भयंकर अवस्था

गेल्या 8 वर्षांपासून महिला हालचाल करू शकत नाही की बोलू शकत नाही.

  • Share this:

वॉशिंग्टन, 13 एप्रिल :  एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर एकतर उलटी, पोटात दुखणं किंवा डायरिया झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे. पण कधी एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर लकवा मारल्याचं ऐकलं आहे का? एका मॉडेलच्या बाबतीत हे झालं आहे. अमेरिकेतील एका मॉडेलने बिस्कीट खाल्लं आणि त्यानंतर तिचं ब्रेन डॅमेज झालं. तिला लकवा मारला.

अमेरिकेतील मॉडेल आणि अभिनेत्री शांटेल ग्याकेलोन.  2013 साली शांटेल लॉस वेगासमध्ये एका मॅजिक फॅशन ट्रेड शोमध्ये मॉडेलिंग करत होती. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने तिला एक बिस्कीट खायला दिलं. हे बिस्कीट खाल्यानंतर ती शॉकमध्ये गेली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आता तुम्ही म्हणाल एका बिस्कीटामुळे असं कसं होऊ शकतं? असं त्या बिस्किटात नेमकं काय होतं? तर या बिस्कीटमध्ये पीनट बटर (peanut butter biscuit) होतं आणि शांटेलला पीनटची अॅलर्जी (peanut allergy) आहे. तिच्या मैत्रिणीलासुद्धा हे माहिती नव्हतं.  त्यामुळे बिस्कीट खाताच शांटेल एनाफायलेक्टिक शॉकमध्ये गेली. ही स्थिती अॅलर्जी रिअॅक्शनमुळे उद्भवते. ही खूप दुर्मिळ समस्या आहे आणि त्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर मृत्यूही होऊ शकतो.

हे वाचा - प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेने केली कमाल; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

या समस्येवर एपिनफ्रिइन (epinephrine) नावाचं औषध दिलं जातं. पण हे औषध लगेच दिलं नाही तर प्रकृती गंभीर होते. शांटेलला रुग्णालयात नेल्यानंतरसुद्धा हे औषध देण्यात आलं नाही त्यामुळे तिची प्रकृती जास्त गंभीर झाली. रुग्णालयात उपचारानंतर तिचा मेंदू काही मिनिटांसाठी बंद झाला होता, असं शांटेलचे वकिल क्रिस मॉरिस यांनी कोर्टात सांगितलं.

त्यामुळे लॉस वेगास कोर्टाने शांटेलच्या वैद्यकीय खर्चासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी 29.5 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 222  कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचा - हे काय भलतंच! इथं मातीत पुरले जात आहेत चक्क Underwear

शांटेल तेव्हा 27 वर्षांची होती. आज ती  35 वर्षांची आहे. पण आहे त्याच स्थितीत आहे. कुटुंबाच्या देखरेखीत ती आहे. गेज कॉम्प्युटरमार्फत ती लोकांशी संवाद साधते. यूट्युब व्हिडीओ पाहून गाण्याचा प्रयत्न करते आणि फेस एक्स्प्रेशनमार्फत डान्स करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे कोर्टामार्फत मदतीसाठी जे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे तिच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Published by: Priya Lad
First published: April 13, 2021, 6:30 PM IST

ताज्या बातम्या