मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हेल्दी म्हणून दिवसभर प्यायची Energy Drink, तरुणीची झाली भयंकर अवस्था; शेअर केला आपला VIDEO

हेल्दी म्हणून दिवसभर प्यायची Energy Drink, तरुणीची झाली भयंकर अवस्था; शेअर केला आपला VIDEO

ही तरुणी दिवसाला एनर्जी ड्रिंकचे 12 ते 14 कॅन फस्त करायची.

ही तरुणी दिवसाला एनर्जी ड्रिंकचे 12 ते 14 कॅन फस्त करायची.

ही तरुणी दिवसाला एनर्जी ड्रिंकचे 12 ते 14 कॅन फस्त करायची.

मुंबई, 27 सप्टेंबर : दोन दिवसांपूर्वीच कोल्ड ड्रिंक (Cold drink) प्यायल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती (Boy died after drinking coco cola). आता एनर्जी ड्रिंक (Energy Drink) पिऊन एका मुलीची अवस्थाही भयंकर झाली आहे. तसं एनर्जी ड्रिंक हेल्दी मानलं जातं. पण कोणताही पदार्थ  किंवा पेय कितीही हेल्दी असलं तरी ते अति झालं तर हानिकारकच ठरतं (Energy Drink Addiction). याचाच भयंकर अनुभव घेतला तो स्वित्झर्लंडमधील (Switzerland) एका तरुणीची.

स्वित्झर्लंडमध्ये राहणारी 17 वर्षांची मॅस्चाला (Mascha K.) रेड बुल (Red Bull) प्यायला आवडायचं. तिची ही आवड हळूहळू व्यसन बनलं. दिवसाला ती तब्बल 12 कॅन रेड बुल पिऊ लागली.

एक दिवस आपल्या शाळेच्या व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये ती बेशुद्ध झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं तिच्या वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला हार्ट क्रॅम्प्स  (Heart Cramps)  आल्याचं निदान झालं. क्रॅम्पस येण्याचं कारण म्हणजे एनर्जी ड्रिंक होतं. ती नेहमी पित असलेल्या एनर्जी ड्रिंकमुळे तिची अवस्था भयंकर झाली.

हे वाचा - 10 मिनिटात दीड लिटर Coca Cola प्यायला; पोटात भरपूर गॅस झाला आणि घडली भयंकर घटना

मॅस्चाला एनर्जी ड्रिंक इतकं आवडायचं की तिच्या दिवसाची सुरुवातच ती रेड बुलने करायची. कामादरम्यान ब्रेक घेतल्यानंतरही ती रेड बुल प्यायची. संध्याकाळी मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवतानाही ती रेड बुलच प्यायची. मॅस्चाने सांगितलं, डॉक्टरांना तिने आपण दिवसाला 12-14 एनर्जी ड्रिंक पित असल्याची माहिती दिली. तिचं हे व्यसनच रुग्णालयात भरती होण्याचं मुख्य कारण असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याचं तिने सांगितलं.

या घटनेनंतर मॅस्चाला चांगलाच धडा मिळाला आहे. तिने आता एनर्जी ड्रिंक पिण्याच्या या सवयीवर लगाम घातला आहे. पण अद्याप पूर्णपणे सुटली नाही. पण आपल्याप्रमाणे इतरांची अवस्था होऊ नये म्हणून तिने तुम्ही अशी सवय करून घेऊ नका, असा सल्ला दिला आहे.

हे वाचा - तुम्हाला स्मोकिंग सोडायचे आहे, पण सुटत नाही ना? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

मॅस्चाने रुग्णालयातूनच स्वतःचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. टिकटॉक व्हिडीओत ती हातात रेड बुलचा कॅन घेऊन रुग्णालयातील बेडवर झोपलेली दिसते. या व्हिडीओL तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, हे खूप पिऊ नका. अशाप्रकारचे ड्रिंक तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तुमचा जीव धोक्यात घालू शकतात, असं सांगत तिने लोकांना सावध केलं आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle