नवी दिल्ली, 10 मे : सध्या उन्हाळा सुरू असून विविध प्रकारची फळे बाजारात येऊ लागली आहेत. उन्हाळा हा तसा सर्वात त्रासदायक ऋतु असला तरी एका कारणामुळे तो अनेकांना हवाहवासा वाटत असतो, ते म्हणजे आंबा. आंब्यासाठी लोक या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतात. उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत आंब्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. मार्चमध्ये आंब्याची आवक होण्याची प्रतीक्षा सुरू होत असली तरी एप्रिल महिन्यापर्यंत आंबे बाजारात येण्यास सुरुवात होते. तुम्हीही आंबा खरेदी करायला जात असाल तर ही बातमी
(How to buy sweet mangoes) तुमच्या कामाची आहे.
आंबा खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अनेक वेळा बाहेरून ताजा आणि चांगला दिसणारा आंबा आतून खराब आणि बेचव निघू शकतो. बाजारातून चांगले ताजे आणि गोड आंबे घ्यायचे असतील तर काही टिप्स तुम्हाला मदत करू शकतात.
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, काही टिप्स फॉलो करून आंबा खरेदी केल्यास हमखास गोड लागेल.
1. ट्रिक नंबर 1 -
गोड-चवीष्ट आंबे खरेदी करण्यासाठी, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की जेव्हाही तुम्ही आंबा खरेदी करता तेव्हा त्याच्या रंगापेक्षा त्याच्या सालीचा जास्त विचार करा. आंबा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला असल्यास त्याच्या सालीवर एक डागही पडत नाही, तर केमिकल टाकून पिकवल्यास त्यावर डाग आणि कळे स्पॉट दिसतात.
2. दुसरा उपाय -
गोड आंबा खरेदी करताना थोडासा दाबून वास घ्या. आंब्याचा सुगंध येत असेल तर समजून घ्या की, तो नैसर्गिकरित्या पिकलेला आणि गोड असेल. आंब्यातून अल्कोहोल किंवा केमिकल्सचा वास येत असेल तर चुकूनही असा आंबा खरेदी करू नका, कारण असे आंबे खाल्ल्याने लोक आजारी पडू शकतात आणि ते आंबे गोडही नसतात.
हे वाचा -
शिजवलेल्या अन्नावर वरुन कच्चे मीठ घेऊ नये, अन्यथा होऊ शकतो गंभीर आजार
आंबा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा -
अनेक वेळा वरून पिकलेला आंबा आतून कच्चा निघतो. त्यासाठी थोडा मऊ झालेला आंबा खरेदी करा. परंतु, जास्त मऊ लागणारे-पिकलेले आंबे खरेदी करू नका कारण ते आतून कुजलेले असू शकतात.
उन्हाळ्यात आंबा खाण्याचे फायदे
कर्करोग रोखण्यासाठी उपयुक्त
डोळे तेजस्वी होतात.
हे वाचा -
पालकांनो मुलांना Lollipop देताय सावधान! आधी ही बातमी जरूर वाचा
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त
त्वचेसाठी फायदेशीर आहे
पचन सुधारण्यास उपयुक्त
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
उष्णतेपासून संरक्षण करण्यास मदत होते
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.