मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /उन्हाळ्यात होणाऱ्या लोडशेडिंगमध्ये 'हा' छोटा जनरेटर ठरू शकतो वरदान

उन्हाळ्यात होणाऱ्या लोडशेडिंगमध्ये 'हा' छोटा जनरेटर ठरू शकतो वरदान

'हा' छोटा जनरेटर उन्हाळ्यात ठरू शकतो वरदान; चार्जिंगसाठी ना वीज लागते, ना डिझेल

'हा' छोटा जनरेटर उन्हाळ्यात ठरू शकतो वरदान; चार्जिंगसाठी ना वीज लागते, ना डिझेल

उन्हाळ्यात विजेची संपूर्ण व्यवस्था असावी या हेतूने काही जण डिझेलवर चालणारे जनरेटर वापरतात; पण हा महागडा जनरेटर प्रत्येकाला घेता येत नाही. तेव्हा उन्हाळ्यात कडक उन्हापासून वीज बनवणारा 'सौर ऊर्जा जनरेटर' उपयोगी पडतो आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 9 फेब्रुवारी : पूर्वीच्या तुलनेत आता देशातली वीजपुरवठा व्यवस्था खूपच चांगली आहे. आता अनेक राज्यांतल्या खेड्यापाड्यात 24 तास वीजपुरवठा सुरू झाला आहे; पण विविध कारणांमुळे उन्हाळ्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत असतो. या वीजकपातीचा उन्हाळ्यात फार त्रास होतो. उन्हाळ्यात विजेची संपूर्ण व्यवस्था असावी या हेतूने काही जण डिझेलवर चालणारे जनरेटर वापरतात; पण हा एक महागडा पर्याय असल्याने प्रत्येकाला जनरेटर घेता येत नाही. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात कडक उन्हापासून वीज बनवणारा 'जीनी' मिळाला तर! हा जीनी म्हणजे 'सौर ऊर्जा जनरेटर' आहे. या जनरेटरसाठी डिझेलची गरज भासणार नाही. त्यामुळे पैशांची बचत होईल आणि वीजही मिळेल.

  तुम्हाला कमी किमतीत जनरेटर घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी ई-कॉमर्स वेबसाइटवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर त्यापैकीच एक आहे. हा जनरेटर लहान घराच्या गरजा सहज भागवू शकतो. तो अतिशय कॉम्पॅक्ट असल्यानं त्याला 'छोटू जनरेटर' म्हटलं जात आहे. अ‍ॅमेझॉनवर अनेक प्रकारचे पोर्टेबल जनरेटर उपलब्ध आहेत.

  हे ही वाचा: Weight Loss : ब्रेड की चपाती, वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? माहिती असायलाच हव्या या गोष्टी

  सर्वद पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर :

  हा एक पोर्टेबल जनरेटर आहे. यामध्ये ग्राहकांना 150W एसी आउटपुट मिळतं. तो फक्त 1.89 किलो वजनाचा आहे. यावरून तो किती लहान आकाराचा आहे, याचा अंदाज बांधता येतो.

  तो तुमच्या बॅगेत सहज मावेल, त्यामुळे तो तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. यात दोन डीसी पोर्ट असून तीन यूएसबी पोर्ट उपलब्ध आहेत. यासोबतच यामध्ये एलईडी फ्लॅशलाइटही देण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनवर याची किंमत 16 हजार रुपये आहे. मोठ्या जनरेटरच्या तुलनेत त्याची किंमत खूपच कमी आहे. तुमचा वीजवापर जास्त असेल तर तुम्हाला जास्त क्षमतेची बॅटरी असलेला सोलर जनरेटर विकत घ्यावा लागेल. जास्त क्षमतेच्या बॅटरीच्या जनरेटरची किंमतही जास्त असते.

  हे ही वाचा: reki: केवळ हाताच्या स्पर्शाने आपण शारिरीक व मानसिक व्याधी दूर करु शकतो !

  सूर्यप्रकाशाने होईल चार्ज :

  छोटा जनरेटरचं डिझाइन अतिशय कॉम्पॅक्ट आहे. त्यामुळे तुम्ही वॉल आउटलेट वापरून किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवून तो चार्ज करू शकता. म्हणजेच तो विजेवर चार्ज करण्याची गरज नाही. यात एक एलईडी लाइट आहे. तो तुम्हाला कॅम्पिंग किंवा प्रवास करताना मदत करू शकतो. हा जनरेटर पूर्ण चार्ज होण्यासाठी सहा ते सात तास लागतात. फोन, टॅबलेट, लॅपटॉप, हॉलिडे लाइट, रेडिओ, मिनी फॅन आणि टीव्हीसाठी यातली वीज वापरता येते.

  First published:

  Tags: Summer, Summer hot, Summer season