मराठी बातम्या /बातम्या /religion /reki: केवळ हाताच्या स्पर्शाने आपण शारिरीक व मानसिक व्याधी दूर करु शकतो !

reki: केवळ हाताच्या स्पर्शाने आपण शारिरीक व मानसिक व्याधी दूर करु शकतो !

फक्त शरीरावरच नाही तर मन व आत्मा यांचे ही संतुलन राखणे रेकीमुळे साध्य होते.

फक्त शरीरावरच नाही तर मन व आत्मा यांचे ही संतुलन राखणे रेकीमुळे साध्य होते.

फक्त शरीरावरच नाही तर मन व आत्मा यांचे ही संतुलन राखणे रेकीमुळे साध्य होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India


मुंबई , 8 फेब्रुवारी: आजकाल आपण रेकी हिलिंग असे शब्द खूप ऐकतो पण नक्की रेकी म्हणजे काय असत हे आज आपण जाणून घेऊयात.  रेकी ही एक निसर्गातील प्राणशक्ती आहे  जी संपूर्ण विश्वात सामावलेली आहे जिला आपण वैश्विक उर्जा असे म्हणतो. ही शक्ती इतकी प्रभावी आहे की, केवळ हाताच्या स्पर्शाने आपण शारिरीक व मानसिक व्याधी दूर करु शकतो.

मनुष्याच्या शरीरात 7 प्रमुख शक्ती केंद्र असतात  ज्यांना चक्र म्हटले जाते.  सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, व मुलाधार चक्र ही सात चक्र आपल्या शरीरातील विविध अवयवांवर नियंत्रण ठेवून त्यांचे संतुलन राखतात.

या चक्रांना विशिष्ट प्रकारे गतीमान करुन क्रियाशील केले जाते आणि त्यामुळे विश्वव्यापी रेकी शक्ती बरोबर आपण एकरुप होतो.  पण ही प्रक्रीया गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करणे अत्यंत महत्वाचे असते.ज्याला ऍटयुनमेंट रेकी उर्जे बरोबर जोडणे (रेकी दीक्षा) असे म्हटले जाते.  अशाप्रकारे योग्य गुरु कडून रेकी दीक्षा घेणारी व्यक्तीच रेकी शक्ती ग्रहण करु शकते, दुसऱ्यांना रेकी देऊ  शकते व आयुष्यभरासाठी ती रेकीचे माध्यम बनून जाते.

आपल्या शरीरातील सात चक्रांपैकी पहिली दोन चक्र सहस्त्रार चक्र व आज्ञा चक्र यांचा संबंध आपल्या अध्यात्मिक शक्तीशी येतो व उर्वरीत पाच चक्र आहेत ती पंचमहाभूतांशी जोडली गेलेली आहेत.  आपल्या शरीरातील एका ही तत्वाचे असंतुलन झाल्यास आपण आजारी पडतो.  रेकीद्वारा आपली सात ही चक्र संतुलित राखली जातात व आपण व्याधीमुक्त जीवन जगतो.

फक्त शरीरावरच नाही तर मन व आत्मा यांचे ही संतुलन राखणे रेकीमुळे साध्य होते. रेकी ही अतिशय पवित्र व प्रभावी  दैविशक्ती आहे.

 योगिनी डॉ. स्मिता राऊत

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion