मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss : ब्रेड की चपाती, वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? माहिती असायलाच हव्या या गोष्टी

Weight Loss : ब्रेड की चपाती, वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? माहिती असायलाच हव्या या गोष्टी

योग्य प्रमाणातील वजन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. जास्त वजन असलेल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी बऱ्याचदा मनस्तापाचा सामना करावा लागतो. तसेच अनेक आजारही त्यांना हळूहळू घेरू लागतात.

योग्य प्रमाणातील वजन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. जास्त वजन असलेल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी बऱ्याचदा मनस्तापाचा सामना करावा लागतो. तसेच अनेक आजारही त्यांना हळूहळू घेरू लागतात.

योग्य प्रमाणातील वजन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. जास्त वजन असलेल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी बऱ्याचदा मनस्तापाचा सामना करावा लागतो. तसेच अनेक आजारही त्यांना हळूहळू घेरू लागतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 9 फेब्रुवारी : वजन कमी करण्यासाठी हल्ली लोक यानेच उपाय करून पाहतात. खूप व्यायाम करतात, झोपेच्या वेळा निश्चित करतात, खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. कारण योग्य प्रमाणातील वजन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. जास्त वजन असलेल्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी बऱ्याचदा मनस्तापाचा सामना करावा लागतो. तसेच अनेक आजारही त्यांना हळूहळू घेरू लागतात.

म्हणूनच सध्या वजन कमी करण्याकडे सर्वांचे लक्ष असते. मात्र यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नाही. त्याबरोबर तुम्ही काय खाता हेदेखील तितकाच महत्वाचं आहे. अनेक लोकांना हा प्रशा पडतो की, वजन कमी करण्याच्या प्रवासात त्यांच्यासाठी ब्रेड उत्तम राहील की चपाती. तर याचे उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही देखील खाता का सॅलेड? मग जरा सांभाळून, कधीही करु नका 'या' चूका

चपाती ही मुळातच कोणत्याही केमिकलशिवाय आणि एक लांबलाचा प्रोसेसने बटायर एली जाते. चपाती बनवण्यासाठी आल्याला कणिक मळून त्याची चपाती लाटून आणि ती सर्व बाजूने व्यवस्थित भाजावी लागते. मात्र ब्रेडचे तसे नाही. ब्रेड बनवण्यासाठी यीस्टचा वापर केला जातो आणि यामध्ये परिजर्व्हेटिव्ह्स सुद्धा असतात. तसेच ब्रेडमध्ये फायबरचे प्रमाण नसल्यातच जमा असते. त्यामुळे ब्रेडपेक्षा वजन कमी करण्यासाठी चपाती हाच उत्तम उपाय असल्याचे लक्षात येते. हाच मुद्दा पटवून आणखी काही मुद्दे आज आम्ही मांडणार आहोत.

- झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, चपातीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि सोल्युबल फायबर असतात. या पोषक तत्वांमुळे चपाती ब्रेडपेक्षा निश्चितच पौष्टिक पर्याय ठरतो. हे फायबर तुम्हाला ऊर्जा देतात, निरोगी रक्ताभिसरणाला चालना देतात आणि जास्त काळ तुमचे पोट भरलेले ठेवतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

- चपातीमध्ये यीस्ट नसते. ब्रेड मऊ बनवण्यासाठी फुलगवण्यासाठी यीस्टचा वापर केला जातो. त्यामुळे ब्रेड खाल्याने शरीर डिहायड्रेट होऊ शकते आणि पचनसंस्थेत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ते खाण्यासाठी चापटीपेक्षा उत्तम मानले जात नाही.

- ब्रेडचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. तसेच ते अनेकदा गोड किंवा खारट बनवले जातात. यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी ते अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे रक्तातील साखर आणि वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर ब्रेडऐवजी रोटी खा.

हे वाचा : पुदिन्यामध्ये आहेत अनेक औषधी गुणधर्म; 7 महत्त्वाचे फायदे येथे जाणून घ्या

- भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह टाकून ब्रेड तयार केले जातात, त्यामुळे ते बरेच दिवस खाता येतात. पण चपात्या केल्यानंतर लगेच खाल्ल्या जातात आणि ताजे अन्न आणि कमी प्रिझर्व्हेटिव्ह्जमुळे चपातीचे शेल्फ लाइफ कमी असते. म्हणूनच चपात्या हेल्दी पर्याय आहे.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss tips