• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Surya Grahan 2019: उद्या दिसणार खग्रास सूर्यग्रहण; काय आहे या ग्रहणाचं वैशिष्ट्य?

Surya Grahan 2019: उद्या दिसणार खग्रास सूर्यग्रहण; काय आहे या ग्रहणाचं वैशिष्ट्य?

भारतीय वेळेनुसार उद्या 2 जुलै 2019 च्या रात्री 10.25 मिनटांनी या ग्रहणाला सुरुवात होणार असून मध्यरात्री 3 वाजून 21 मिनटांपर्यंत चालणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 जुलै :  या महिन्याच्या सुरुवातीलाच, पहिल्या अमावस्येला खग्रास सूर्यग्रहण (total solar eclips 2019) दिसणार आहे. उद्या म्हणजे 2 जुलै 2019 ला  जगातल्या अनेक भागातून हे ग्रहण दिसेल. पण भारतात मात्र त्या वेळी रात्र असल्याने आपल्याला हे ग्रहण दिसू शकणार नाही. हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका, दक्षिणमध्य अमेरिका, प्रशांत महासागर आणि अटलांटिका म्हणजेच अर्जेंटिना या भागांमध्ये दिसून येणार आहे. भारतात मात्र हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही. भारतीय वेळेनुसार उद्या 2 जुलै 2019 च्या रात्री 10.25 मिनटांनी या ग्रहणाला सुरुवात होणार असून मध्यरात्री 3 वाजून 21 मिनटांपर्यंत चालणार आहे. म्हणजे एकूण चार तास हे सूर्यग्रहण सुरू असेल. सेरेना, सैन जुआन, ब्रागाडो, जूनिन ओरिओ कुआर्टो, चिली आणि अर्जेंटीनामधील काही शहरांमध्ये या सूर्यग्रहणाचं दर्शन होईल. अमेरिका इराणवर कधीही हल्ला करु शकते; ट्रम्प देऊ शकतात हा आदेश! हे 2019 वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 6 जानेवारीला 2019 ला  दिसलं होतं. तेसुद्धा खग्रास सूर्यग्रहण होतं. तर, 16 जुलै 2019 तारखेला खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळेल. यानंतर 2019 च्या डिसेंबरला तिसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. 'कंकणाकृती' सूर्यग्रहण ज्याला  ‘रिंग ऑफ फायर’ म्हणतात, असं ते सूर्यग्रहण असणार आहे. 26 डिसेंबरला हे ग्रहण दिसेल आणि मुख्य म्हणजे ते भारतातून पाहता येईल. भारताशिवाय सौदी अरेबिया, कतार, सुमात्रा, बोरनियो, गुआम आणि फिलिपीन्स या देशांतही ते पाहता येईल. World Cup : रोहितचे 2 षटकार आणि धोनीचा खेळ खल्लास! चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरत असतो आणि सूर्य आणि पृथ्वीच्या बरोबर मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवरून सूर्याचं दर्शन पूर्णपणे होत नाही. या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. 2 जुलैचं खग्रास सूर्यग्रहण NASA च्या वेबसाईटवरून ते LIVE पाहता येईल. जगभरातले खगोल अभ्यासक आणि विज्ञानप्रेमी या ग्रहणासाठी दुर्बिणी सरसावून बसले आहेत. खग्रास सूर्यग्रहण साध्या दुर्बिणीनं पाहणं धोकादायक असतं. विशिष्ट काळ्या काचेतूनच ते पाहावं. VIDEO: चिंब पाऊस, ती आणि पेंटिंग...
  First published: