वॉशिंग्टन, 23 जून: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्या ऐवजी वाढतच चालला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी स्पष्ट केले की ते इराणवर लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहे. दोनच दिवसांपूर्वी इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडले होते. या डोन पाडण्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. पण ऐन हल्ल्याच्या आधी त्यांनी तो मागे देखील घेतला होता. इराणसोबतच्या या तणावाच्या पाश्वभूमीवर अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याचा आग्रह केला आहे. ट्रम्प सुट्टीसाठी कॅम्प डेव्हिडला रवाना होण्याआधी म्हणाले, मी 150 इराणी नागरिकांना ठार मारू इच्छित नाही. 150 जणांना मारण्याची माझी इच्छा देखील नाही, जोपर्यंत तसे करणे मला गरजेचे वाटत नाही तोपर्यंत मी करणार नाही. सोमवारपासून इराणवर अनेक निर्बंध लादले जातील असे देखील त्यांनी सांगितले. त्याआधी इराणने जर अणूबॉम्ब निर्मिती करण्याचे काम बंद केले तर अमेरिका त्यांचा सर्वात चांगला मित्र होऊ शकते असे विधान केले होते. अध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विटवरून इराणवर निर्बंध लादले जातील असे जाहीर केले. त्याच वेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केले की मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा इराणवरील निर्बंध हटवले जातील आणि तो एक समृद्ध देश होईल. ही गोष्ट इतक्या लवकर होईल तितके चांगले आहे. काय आहे वाद? 13 जून रोजी अमेरिकेच्या दोन इंधनाच्या टॅकरला आग लागण्यानंतर दोन्ही देशात तणावाला सुरुवात झाली. अमेरिकाने ओमान खाडीत इंधनाच्या टॅकरवर झालेल्या हल्ल्याला इराणला दोष दिला. त्याच्याआधी म्हणजेच मे महिन्यात समुद्रात होणाऱ्या हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरले होते. त्यानंतर इराणने अमेरिकेचे MQ-4C ट्राइटन ड्रोन पाडून थेट आव्हान दिले. इतक नव्हे तर अमेरिकेसाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. कारण हे ड्रोन सर्वात आधुनिक आणि शक्तिशाली होते. त्यामुळे अमेरिकेसाठी ही लाजीवाणी गोष्ट ठरली आहे. 2032पर्यंत MQ-4C प्रकारचे 32 ड्रोन ताफ्यात घेण्याचा अमेरिकेचा विचार आहे. या ड्रोनचे वैशिष्टे म्हणजे हे 30 तास 56 हजार फुटावरून उड्डण करु शकते. यातील जबरदस्त लेसरमुळे फुल मोशन व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. तसेच लक्ष्याचा अचूक वेध घेता येतो. या ड्रोनमध्ये रॉल्स रॉईसचे इंजिन वापरण्यात आले असून ते 50 फूट लांब आहे. याच्या पंखाची लांबी 130 फुट इतकी आहे. प्रती तास 368 मैल इतक्या वेगाने MQ-4C प्रवास करू शकते. ड्रोन पाडण्यात रशिया कनेक्शन… अमेरिकेचे ड्रोन पाडण्यात रशियाचे कनेक्शन देखील समोर आले आहे. MQ-4C ड्रोन कोणत्याही साध्या मिसाईलद्वारे पाडता येत नाही. त्यासाठी दमदार रडारद्वारे नियंत्रित होणारे मिसाईल हवे. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इराणकडे रशियाकडून मिळालेली S-300 सिस्टिम आहे. S-300 द्वा्रेच अशा प्रकारचे ड्रोन पाडता येते. असे म्हटले जाते की याच कारणामुळे अमेरिका अधिक भडकली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे MQ-4C ट्राइटन ड्रोन प्रथमच एखाद्या देशाने पाडले आहे. याआधी कोणालाही हे ड्रोन पाडता आले नाही आणि रशियाच्या मदतीने इराणने हे धाडस केल्यामुळे अमेरिकेला अधिक राग आला आहे. अण्विक करारावरून वाद हे मुळ कारण… गेल्या वर्षी अमेरिकेने इराण सोबत झालेल्या अण्विक करारातून स्वत: बाजूला केले होते. यानंतर खऱ्या अर्थाने दोन्ही देशातील तणावाला सुरुवात झाली. अमेरिकेने इराणवर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाचा उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. VIDEO : जो कुणी मुख्यमंत्री होईल त्याला जनतेचे प्रश्न कळलेच पाहिजे -उद्धव ठाकरे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







