आता या बाळाची जबाबदारी दुर्वेश यांच्यावरच आहे. फक्त 8 दिवसांचं बाळ. बाबा आपल्याला हे हवं ते हवं, भूक लागली, झोप आली. असं काहीच ते तोंडाने सांगू शकत नाही, हट्ट करून मागू शकत नाही. पण रडतं आहे, खूप रडतं आहे. भुकेनं ते व्याकूळ झालं आहे, याची कल्पना दुर्वेश यांनाही आहे. त्यांनी आपल्या बाळाला आर्टिफिशिअल दूध देण्याचाही प्रयत्न केला. पण नाही... त्याचा काहीच फायदा झाला नाही. बाळाला आईचंच दूध हवं आहे. त्यामुळे आता त्याचे बाबा अशा आईच्या शोधात आहे, जी त्यांच्या बाळाला आपलं दूध पाजू शकेल. त्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. हे वाचा - भयंकर! तब्बल 12 मोकाट कुत्री चिमुरडीवर तुटून पडली; अंगावर काटा आणणारा VIDEO सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यामध्ये भोपाळच्या चिरायू हॉस्पिटलमध्ये हे बाळ असल्याचं सांगितलं जातं आहे. सोबतच या बाळाच्या वडिलांचा म्हणजे दुर्वेश यांचाही फोन नंबर देण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही स्तनपान करणाऱ्या माता असाल किंवा तुमच्या ओळखीतील कुणी स्तनपान करत असेल आणि या बाळाला दूध पाजू शकणार असेल. तर कृपया या पोस्टमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन केलं जातं आहे.इनकी मदद कर दीजिए प्लीज़ हाथ जोड़ कर विनती है 🙏😖 pic.twitter.com/4EUNlXvg47
— Isha Dehlvi (@Bebaak_Isha) April 20, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Small baby