Home /News /lifestyle /

OMG! 173 वेळा साप चावला तरी त्याला काहीच झालं नाही; उलट 100 वर्षे जगला कारण...

OMG! 173 वेळा साप चावला तरी त्याला काहीच झालं नाही; उलट 100 वर्षे जगला कारण...

20 वेळा त्याची प्रकृती गंभीर झाली पण तो मृत्यूच्या दारातूनही परतला.

    वॉशिंग्टन, 13 सप्टेंबर : साधा एक साप (Snake) चावला तरी किती तरी लोकांचा मृत्यू होतो. अशात 173 वेळा साप चावूनही एखाद्याला काहीच झालं नाही, यावर विश्वास बसणं अशक्यचं. पण हे खरं आहे.  अमेरिकेतील साप संशोधक (Snake Researcher) बिल हास्ट (Bill Haast) ज्यांना स्नेक मॅन (Snake Man) म्हणूनही ओळखलं जात होतं. त्यांना  173 वेळा साप चावला होता (Man bitten by 173 snakes). यामुळे त्यांचा मृत्यू झाला नाही, उलट तो 100 वर्षे जगला. 1910 मध्ये जन्मलेल्या बिलला वयाच्या सातव्या वर्षापासूनच सापांमध्ये रस होता. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने एका विषारी साप चावला होता. 1929 मध्ये तो अमेरिकन वर्ल्ड एअरवेजशी जोडला गेला. त्यानंतर तो देशविदेशात फिरायचा. तेव्हा दुसऱ्या देशातील साप तो अमेरिकेत आणायचा. 1946 मध्ये त्याने पहिल्यांदाच कोब्रा आणला. त्यानंतर त्याने मियामी सर्पेंटेरियमची स्थापना केली. हे वाचा - Shocking! ना प्रेग्नन्सीचं लक्षण, ना बेबी बम्प; तिने 2 महिन्यात दिला बाळाला जन्म वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार बिलकडे 10 हजारपेक्षा अधिक साप होते. यामध्ये समुद्री साप, आफ्रिन ट्री स्नेक, कोब्रा, रॅटल स्नेक अशा कितीतरी विषारी सापांचा समावेश होता.  या सापांचं विष काढून तो संशोधनासाठी पाठवत असे. बिल सापांना पकडायचा आणि त्याचं विष काढून औषध बनवण्यासाठी संशोधकांना द्यायचा, यामुळे किती तरी लोकांचा जीव वाचवण्यात त्याने मदत केली आहे. या सापांपासून तो स्वतःला दंश करून घेत असे जेणेकरून त्याच्या शरीरात विषाविरोधात प्रतिकारक शक्ती तयार होईल.  2008 सालापर्यंत त्यांनी स्वतःला 173 विषारी सापांकडून (173 poisonous snakes) दंश करून घेतला. 20 वेळा त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्याचा जीव जाता जाता राहिला.  शरीरात इम्युनिटी निर्माण करण्यासाठी तो Mithridatismपद्धतीची वापर करायचा. यामध्ये एखाद्या व्यक्तीला मर्यादित स्वरूपात वेळोवेळ विष दिलं जायचं. यामुळे त्याचा मृत्यू होत नाही तर त्याच्या शरीरात सापाच्या विषाविरोधात अँटिबॉडी तयार होते. हे वाचा - पोटच्या गोळ्यासाठी आईने स्वीकारलं अपंगत्व; स्वतःचा पाय कापून दिला बाळाला जन्म इतक्या विषारी सापांनी चावल्यानंतरही तो शंभर वर्ष जगला. शंभरव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. 2011 साली त्याचा मृत्यू झाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Snake

    पुढील बातम्या