सर्पदंशावर आता लवकरच टॅबलेट, तात्काळ कमी करणार विषाचा परिणाम

सर्पदंशावर आता लवकरच टॅबलेट, तात्काळ कमी करणार विषाचा परिणाम

सर्पदंशावरील प्रथमोपचार म्हणून हे औषध वापरता येईल.

  • Share this:

ब्रिटन, 13 मे : सर्पदंशानंतर (snake bite) अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो. यापैकी काही लोकं घाबरूनच जीव सोडतात तर काही व्यक्तींना रुग्णालयात नेईपर्यंत योग्य प्रथमोपचार न मिळाल्यानं त्यांचा जीव जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 4.5 ते 5.4 दशलक्ष लोकांना सर्पदंश होतो. त्यापैकी 1.8 ते 2.7 लोकांना क्लिनिकल इलनेस आणि 81,000 ते 138 000 लोकं गुंतागुंत निर्माण झाल्यानं दगावतात.

मात्र आता सर्पदंश झालेल्या व्यक्तींना वाचवता येणं शक्य होणार आहे.ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी असं औषध तयार केलं आहे, जे साप चावल्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ देता येऊ शकेल आणि शरीरात विषाचा परिणाम कमी करता येऊ शकेल. विशेष म्हणजे हे औषध टॅबलेटच्या स्वरूपात उपलब्झ होणार आहे, जे सामान्य व्यक्तींना घेणं शक्य होईल.

हे वाचा - कोरोनाच्या संकटात AC Train चा प्रवास सुरक्षित आहे का?

या औषधात शास्त्रज्ञांनी डाइमेर्काप्रॉल आणि डीपीएमएस या घटकांचा वापर केला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हे दोन्ही घटक सापाच्या विषाचा परिणाम कमी करतात. सर्वाधिक विषारी समजल्या जाणाऱ्या वायपर सापाच्या विषावर शास्त्रज्ञांनी अभ्यास करून पाहिला. या औषधाचा प्राण्यांवरील प्रयोग यशस्वी ठरला आहे.  हे औषध विषाचा प्रभाव कमी करत असल्याचं दिसून आलं आहे. सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीन जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

हे वाचा - दिलासा की चिंता? कोरोनाच्या दहशतीत 'या' आजाराचे रुग्ण कमी झाले

विशेष म्हणजे हे औषध टॅबलेटच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे, जे तोंडावाटे घेता येईल. सामान्यपणे सर्पदंशावरील औषध इंजेक्शनमार्फत दिलं जातं. मात्र हे औषध टॅबलेट स्वरूपात उपलब्ध होणार आहे. मात्र आतापर्यंत इंजेक्शनमार्फत दिल्या जाणाऱ्या औषधाला हे टॅबलेट स्वरूपातील औषध पर्याय नाही, असं ही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. हे औषध सर्पदंशावरील प्राथमिक उपचार म्हणून वापरता येऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पुढील उपचार मिळेपर्यंत हे औषध त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यास मदत करेल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 13, 2020, 7:49 AM IST

ताज्या बातम्या