Home /News /lifestyle /

सावधान !  प्रेग्नन्सीमध्ये करू नका ‘ही’ चूक; नाहीतर बाळाला होऊ शकतं फ्रॅक्चर

सावधान !  प्रेग्नन्सीमध्ये करू नका ‘ही’ चूक; नाहीतर बाळाला होऊ शकतं फ्रॅक्चर

गरोदरपणात (Pregnancy) धूम्रपान केल्याने जन्मणाऱ्या बाळाच्या हाडांवर (Bone) परिणाम होतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

    स्कॉटहोल्म, 30 जानेवारी :  गरोदर (Pregnant) महिलेने आपल्या आरोग्याची, आहाराची काळजी घेणं जास्त गरजेचं असतं, कारण त्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. प्रेग्नन्सीमध्ये (Pregnancy) धूम्रपान केल्याने गर्भातल्या बाळाच्या विकासावर, वाढीवर परिणाम होतो, याबाबत संशोधन झालं आहे. मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार गरोदर असताना धूम्रपान केल्याने बाळाच्या जन्मानंतर त्याच्या हाडांवर परिणाम होतो. जन्मानंतर पहिल्याच वर्षात बाळाला फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. स्विडीश (Swedish) संशोधकांनी केलेला हा अभ्यास ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (The British Medical Journal) प्रसिद्ध करण्यात आला आहे. हेदेखील वाचा - सिझेरियन नको, नॉर्मल डिलिव्हरी हवी; मग गरोदरपणात घ्या 'ही' काळजी संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, धूम्रपान करणाऱ्या महिला - मुलांच्या फ्रॅक्चरचं प्रमाण प्रति वर्ष 1000 व्यक्तींमागे 1.59 होतं धूम्रपान न करणाऱ्या महिला - मुलांच्या फ्रॅक्चरचं प्रमाण प्रति वर्ष 1000 व्यक्तींमागे 1.28 होतं म्हणजेच धूम्रपान करणाऱ्या आणि न करणाऱ्या महिलांच्या मुलांमध्ये फ्रॅक्चरच्या प्रमाणातील तफावतीचा दर 1000 व्यक्तींमागे 0.31 टक्के होता. हेदेखील वाचा - स्त्रियांनी SEX नंतर चुकूनही करू नयेत 'या' 5 गोष्टी धूम्रपानाच्या प्रमाणानुसारदेखील हा दर तपासण्यात आला धूम्रपान न करणाऱ्या महिलांशी तुलना करता, दिवसाला 1 ते 9 सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये हा धोका 20% तर दिवसाला 10 आणि त्यापेक्षा जास्त सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये हा धोका  41% ने वाढतो हा परिणाम बाळाच्या जन्मानंतर पहिल्याच वर्षात जास्त दिसून आला आहे. किशोरवयात आणि तरुणवयात फारसा परिणाम दिसून आला नाही, असं संशोधकांनी सांगितलं. दरम्यान हा अभ्यास निरीक्षणावर आधारित असल्याने या संशोधनाला काही मर्यादा असल्याचंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. सोर्स - ANI
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Pregnancy, Pregnant

    पुढील बातम्या