• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • चांगलं आरोग्य हवं असेल तर या वेळी नका पिऊ पाणी; जास्त पाणी प्याल तर द्याल गंभीर आजारांना निमंत्रण

चांगलं आरोग्य हवं असेल तर या वेळी नका पिऊ पाणी; जास्त पाणी प्याल तर द्याल गंभीर आजारांना निमंत्रण

उभं राहून पाणी पिताना शरीरातील अनेक स्थायूंवर एकाच वेळी ताण येत असतो. पण बसून पाणी प्यायल्यास पॅरासिम्पॅटेपेटिक म्हणजेच स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणाऱ्या प्रक्रिया रिलॅक्स आणि डायजेशन मोडवर असते.

उभं राहून पाणी पिताना शरीरातील अनेक स्थायूंवर एकाच वेळी ताण येत असतो. पण बसून पाणी प्यायल्यास पॅरासिम्पॅटेपेटिक म्हणजेच स्नायू आणि मज्जातंतूच्या एकत्रित सहभागाने होणाऱ्या प्रक्रिया रिलॅक्स आणि डायजेशन मोडवर असते.

आरोग्यासाठी डॉक्टर नेहमीच दिवसभरात पुरेसे आणि योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण अतिपाणी पिऊनही त्रास होतो. पाणी किती आणि कोणत्या वेळेला प्यावं यालाही महत्त्व आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : आरोग्याच्या दृष्टीने (Health) पाणी (Water) हे अत्यंत महत्वाचं असतं. शरीरात पाणी हे एका औषधाप्रमाणे (Medicine) काम करतं. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टर नेहमीच दिवसभरात पुरेसे आणि योग्य प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. अवयव कार्यक्षम राहावेत, रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहावा यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं महत्वाचं आहे. परंतु, दिवसभरात पाणी पिण्यासाठी काही ठराविक वेळा असतात. त्या वेळांचे पालन केले नाही तर त्याचा प्रतिकूल परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. दिवसभरात कोणत्यावेळी पाणी प्यावे आणि कोणत्या वेळी पाणी पिऊ नये, जाणून घ्या.. शरीराच्या कार्यक्षमतेसाठी ठराविक वेळी पाणी पिणं आवश्यक असतं. परंतु, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते नुकसानदायी ठरु शकतं. दिवसभरात अशा काही वेळा आहेत, की त्यावेळी तुम्ही पाणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अशा काही वेळा आहे की त्यावेळी तुम्ही पिणं टाळावं. शरीराच्या कार्यक्षमतेसाठी ठराविक वेळी पाणी पिणं आवश्यक असतं. परंतु, चुकीच्या वेळी पाणी प्यायल्यास ते नुकसानदायी ठरु शकतं. दिवसभरात अशा काही वेळा आहेत, की त्यावेळी तुम्ही पाणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अशा काही वेळा आहे की त्यावेळी तुम्ही पिणं टाळावं. रात्री झोपेपूर्वी अतिप्रमाणात तसंच व्यायामा दरम्यान पाणी पिणं कटाक्षानं टाळावं. किती पाणी शरीराला पुरतं? कसं ओळखायचं? अनेकदा गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास वारंवार लघवी (Urine) करण्यासाठी जावं लागतं. परंतु, अशा वेळी जर तुमची लघवी पूर्णतः पांढरी आणि स्वच्छ असेल, तर काही वेळ पाणी पिण्याची गरज नाही. परंतु, जर लघवी पिवळसर किंवा पिवळ्या रंगाची असेल तर पाणी पिणं आवश्यक असतं. तसेच लघवी पूर्णतः झाली तर तुम्हाला पाणी पिण्याची गरज नाही. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा अघोरी प्रकार; चहाच्या किटलीपायी लहानगा रुग्णालयात जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवणानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये, हे सर्वांना माहिती आहे. ही बाब अन्न पचनासाठी आवश्यक असते. त्यामुळे जेवणानंतर काही वेळानं पाणी पिणं अधिक श्रेयस्कर असतं. काही अहवालांनुसार, जेव्हा तुम्ही व्यायाम (Exercise) करत असता, तेव्हा व्यायामादरम्यान पाणी पिऊ नये. व्यायाम करताना शरीराचं तापमान वाढलेलं असतं. अशा वेळी जर पाणी प्यायलं तर शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला डोकेदुखीसह अन्य त्रास होऊ शकतात. त्यामुळे व्यायाम झाल्यानंतर काही वेळाने पाणी पिणं योग्य असतं.

सिंघम बनायची हौस भोवली, हातात पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवणारा अमरावतीचा हवालदार निलंबित

जाणकारांच्या मते, झोपेपूर्वी (Sleep) पोटभरुन पाणी पिणं टाळावं. यामागे प्रामुख्याने 2 कारणं आहेत. एक म्हणजे असं केल्याने रात्रीच्या वेळी वारंवार लघवी करण्यासाठी उठावं लागतं आणि झोपेवर परिणाम होतो. तसेच रात्रीच्या वेळी किडनीचं (Kidney) कार्य मंदावलेले असतं. त्यामुळे झोपेपूर्वी पाणी प्यायल्यास चेहऱ्याला सूज येण्याची शक्यता असते.
First published: