Home /News /lifestyle /

Skin Care : तुमच्या चेहऱ्यावरील तेज ठेवा कायम, ट्राय करा हे तीन अनोखे फेशियल; मग बघा Glow

Skin Care : तुमच्या चेहऱ्यावरील तेज ठेवा कायम, ट्राय करा हे तीन अनोखे फेशियल; मग बघा Glow

फेशियल केवळ मृत त्वचाच काढून टाकत नाही तर अतिरिक्त तेल आणि अशुद्धतादेखील काढून टाकण्यास (Removes Dead Skin) मदत करते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार पार्लर असिस्टंट वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल करण्याचा तुम्हाला सल्ला देतात.

    मुंबई, 03 जुलै : निरोगी आणि चमकदार त्वचा (Glowing Skin) मिळवणे प्रत्येक मुलीची इच्छा असते. विशेषत: जेव्हा काही दिवसांवर एखादा कार्यक्रम किंवा सोहळा असतो. तेव्हा आपण सर्वानाच उत्तम दिसायचे असते. यासाठी आपला चेहरा सुंदर आणि चमकदार (Glow) दिसावा असे सर्वांना वाटते. ते साध्य करण्यासाठी आपल्यापैकी बहुतेकजण पार्लरमध्ये जातात आणि फेशियल करतात. फेशियल केवळ मृत त्वचाच काढून टाकत नाही तर अतिरिक्त तेल आणि अशुद्धतादेखील काढून टाकण्यास (Removes Dead Skin) मदत करते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार पार्लर असिस्टंट वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल करण्याचा तुम्हाला सल्ला देतात. मात्र तुम्हाला आहे का? की, काही अनोखे फेशियल (Unique Facial) आहेत जे तुम्ही कधीच ऐकले नसतील. जाणून घ्या या तीन विशेष फेशियलबद्दल. नॅनो फेशियल (Nano Facial) हे फेशियल इतर फेशियल प्रमाणे केवळ तुमच्या चेहऱ्यावरी बाह्य त्वचेसाठीच फायद्याचे असते असे नाही. या फेशियलमध्ये चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या, डाग, तेलकट त्वचा, कोरडी त्वचा किंवा सनस्पॉट्स काढून टाकण्यासाठी नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. हा एक वेदनारहित उपचार आहे. जो तुमच्या त्वचेला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करण्यासाठी केला जातो. हे तुमच्या त्वचेच्या अनेक थरांवर कार्य करते जे सामान्य फेशियल करू शकत नाही. 'फिट' व्हायचंय? व्यायाम करताना 'या' चुका टाळाच, नाहीतर.... फायर अँड आइस फेशियल (Fire And Ice Facial) नाव ऐकायलाच वेगळे वाटते ना? हे फेशियल तुमच्या त्वचेला नवीन जीवन देण्यासाठी गरम आणि थंड अशा दोन्ही उपचारांचे मिश्रण आहे. हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. हे तुमच्या त्वचेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खोलवर एक्सफोलिएट करण्यासाठी वापरले जाते. हे बारीक रेषा काढून टाकण्यासाठी आणि तुमची त्वचा मऊ करण्यासाठी बॉटनिकल अॅसिड, रेटिनॉल, अँटिऑक्सिडंट्स आणि नियासिनॅमाइड वापरते आणि त्यानंतर कोरफड, रोझमेरी अर्क, ग्रीन टी अर्क आणि हायलुरोनिक अॅसिड-इन्फ्युज्ड मास्क वापरतात. डायबेटिज रुग्णांनी असा फणस खायला हवा; ब्लड शुगर कमी करण्यासाठी ठरेल रामबाण क्रियोथेरपी (Cryotherapy) हे फेशियल चेहऱ्यावरील सर्वात विचित्र परंतु प्रभावी उपचारांपैकी एक आहे. हे अत्यंत थंड फेशियल आहे ज्यामध्ये तुमचा चेहरा बर्फाच्या बाष्पांच्या संपर्कात येतो ज्यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते आणि सूज कमी होते.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Lifestyle, Skin care

    पुढील बातम्या