मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'फिट' व्हायचंय? व्यायाम करताना 'या' चुका टाळाच, नाहीतर....

'फिट' व्हायचंय? व्यायाम करताना 'या' चुका टाळाच, नाहीतर....

फिटनेससाठी योग्य व्यायाम महत्त्वाचा ठरतो. रोज व्यायाम केल्यास अनेक समस्या दूर होतात. पण फिटनेससाठी व्यायाम सुरू करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

फिटनेससाठी योग्य व्यायाम महत्त्वाचा ठरतो. रोज व्यायाम केल्यास अनेक समस्या दूर होतात. पण फिटनेससाठी व्यायाम सुरू करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

फिटनेससाठी योग्य व्यायाम महत्त्वाचा ठरतो. रोज व्यायाम केल्यास अनेक समस्या दूर होतात. पण फिटनेससाठी व्यायाम सुरू करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

मुंबई, 1 जुलै : बदलत्या जीवनशैलीमुळं (Lifestyle) कित्येक जणांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे फिटनेसकडे (Fitness) कल वाढला आहे. फिटनेससाठी योग्य व्यायाम महत्त्वाचा ठरतो. रोज व्यायाम केल्यास अनेक समस्या दूर होतात. परंतु, फिटनेसच्या नादात अनेक जण योग्य पद्धतीनं व्यायाम (Exercise) करण्याकडे दुर्लक्ष करतात. व्यायाम चुकीच्या पद्धतीनं केला तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होतो. त्यामुळे चुका टाळणं गरजेचं आहे. रोजचा व्यायाम करताना किंवा जिममध्ये वर्कआउट (Workout) करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, याविषयी फिटनेस ट्रेनर्सचं मार्गदर्शन घ्यायला हवं. 'गेटपॉकेट डॉट कॉम'ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. फिटनेससाठी व्यायाम सुरू करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. व्यायामावेळी तुमच्याकडून काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त कशा करायच्या याविषयी फिटनेस ट्रेनर्सनी (Fitness Trainers) काही टिप्स दिल्या आहेत. त्याविषयी जाणून घेऊ या. `व्यायामाला सुरुवात करताना मी एक मोठी चूक केली होती. पूर्वी कधीही मी जिममध्ये ट्रेनिंग घेतलं नव्हतं; पण पहिल्याच दिवशीच जिममध्ये मी क्षमतेपेक्षा जास्त वर्कआउट केलं आणि तेही आठवड्यातून पाच दिवस केलं. तरीही मला अपेक्षित प्रगती जाणवत नव्हती. याऐवजी मी किमान प्रमाणात व्यायामास सुरुवात करुन, हळूहळू व्यायामाचा कालावधी वाढवला असता तर मला निश्चित अपेक्षित प्रगती दिसली असती. हे कदाचित विरोधाभासी वाटू शकेल. पण याचा अर्थ असा की जो व्यायाम तुम्ही करत आहात, सर्वप्रथम त्याच्याशी जुळवून घेणं आणि त्यानंतर ट्रेनिंगची तीव्रता वाढवणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी तुम्हाला तुमच्यात प्रगती दिसू लागते. आठवड्यातून पाच वर्कआऊट्समुळे मला नक्कीच त्रास झाला, परंतु, माझं शरीर ठणठणीत असल्याने या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मला फारसं काही करण्याची गरज भासली नाही. मात्र ही गोष्ट खूप त्रासदायक होती,` असं पर्सनल ट्रेनर हान्ना लेविन यांनी सांगितलं. लेविन म्हणाल्या, `स्वतःच्या गरजेपलीकडे जाऊन काम करणं हे शाश्वत नसतं. जास्त फ्रिक्वेंसी (Frequency) आणि जास्त तीव्रतेनं (Intensity) ट्रेनिंगला सुरुवात केली तर तुम्हाला कदाचित अपयशी झाल्यासारखं वाटू लागेल.` पर्सनल ट्रेनर आणि लेडीज हू क्रंचच्या संस्थापक नॅन्सी बेस्ट म्हणाल्या, `जेव्हा मी पहिल्यांदा योग्य व्यायामाला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ट्रेनिंगमध्ये कोणतंही वैविध्य नव्हतं. मी सकाळी उच्च तीव्रतेच्या वर्कआउट्सकडे आणि स्ट्रेच सीक्वेन्स करण्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे मला हालचाली करताना त्रास होत होता. मला जड वाटत होतं आणि माझी फंक्शनल मूव्हमेंट (Functional Movement) चांगली होत नव्हती. मोबिलिटी वर्क (Mobility Work) म्हणजेच हालचाली हा किती महत्त्वाचा भाग आहे, हे माझ्या लक्षात आले. आपण दिवसभरात फारशी शारीरिक हालचाल करत नाही. त्यामुळे शारीरिक हालचाली योग्य होण्यासाठी ट्रेनिंगची गरज आहे. तुमचं वजन कितीही असो, जेव्हा तुम्ही अगदी सहजपणे शारीरिक हालचाल करता तेव्हा या हालचालींमुळे शरीरात नक्कीच ताकद निर्माण होते. त्यामुळे हालचालींना प्राधान्य देणं आवश्यक आहे,` असं बेस्ट म्हणतात. `मी आता माझ्या ट्रेनिंगच्या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा केलीय. रिहॅब सेशनच्या मदतीनं माझी क्षमता आणि स्थिती ओळखून त्या दृष्टीने ट्रेनिंग सुरू केलं. त्यामुळे मला वजन उचलण्यात अडचण येत नाही. झोपही चांगली लागते आणि कणखर असल्यासारखं वाटतं,` असं बेस्ट यांनी सांगितलं. `व्यायामापूर्वी वॉर्म अप (Warmup) न करणं हे दुखापतीचं कारण ठरू शकतं. लिफ्टसाठी पूर्वतयारी न केल्यानं खांद्याला दुखापत झाली. अशा प्रकारची दुखापत वारंवार होत आहे. विशिष्ट व्यायाम करताना मला त्रास होतो, असं माझा मित्र सांगत होता. वॉर्मअपमुळे शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता वाढते. वॉर्मअपमुळे स्नायूंची लवचिकता वाढते, स्नायूंमधला रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे तुम्ही अधिक क्षमतेनं हालचाली करू शकता,` असं लेविन यांनी सांगितलं. (डायबेटिज रुग्णांनी असा फणस खायला हवा; ब्लड शुगर कमी करण्यासाठी ठरेल रामबाण) `मी धावत असताना माझ्या मांडीला वेदना होत होत्या; पण मला ट्रेनिंग थांबवयचं नव्हतं. त्यामुळे धावत राहिले,` असं पत्रकार आणि फिटनेस तज्ज्ञ मेलिसा बॅरन सांगत होत्या. `वेदनाशामक औषध घेऊन मी व्यायाम करत राहिले. मला योग्य फिजिओही मिळाला नाही. पण शेवटी मला आयटीबी सिंड्रोम असल्याचं निष्पन्न झालं,` असं बॅरन यांनी सांगितलं. `शरीराकडून मिळत असलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत न थांबणं ही एक समस्या आहे. यामुळे दुखापत वाढते. अशा समस्या जाणवत असल्यास एक आठवडा विश्रांती घेणं आवश्यक आहे. वेदना आणि ट्रेनिंगमधून निर्माण होणारी अस्वस्थता या दोन्ही गोष्टी जाणून घेणं अवघड आहे,` असं पर्सनल ट्रेनर लियाना स्वान म्हणतात. `शारीरिक त्रास होत असेल तर काही दिवस ट्रेनिंगला सुट्टी द्या. बरं वाटतं का ते पाहा. बरं वाटलं नाही तर जिममधल्या प्रशिक्षकांशी बोला. त्रास कमी होत नसेल तर फिजिओकडे जा,` असा सल्ला स्वान देतात. फिटनेस आणि वेलनेस पीआर टोरी पोर्टर म्हणतात, `मला ट्रेनिंगदरम्यान वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. कमी खावं आणि जास्त व्यायाम करावा असं सांगितलं जातं; पण तुम्हाला शरीर मजबूत करायचं असेल तर कॅलरीp (Calories) कमी करण्याची गरज नाही. आरोग्याचा विचार करता पुरेसं न खाणं ही मोठी चूक आहे. शरीराला पुरेशी ऊर्जा मिळाली नाही तर स्नायू बळकट होत नाहीत. ` `शरीराला पुरेसं इंधन मिळतंय की नाही याची खात्री करा. कमी कॅलरीजचा पर्याय निवडण्याऐवजी पुरेशा प्रमाणात प्रोटीन खाण्यावर भर द्या. सर्व पदार्थ योग्य प्रमाणात खाण्यावर भर द्या. तुम्ही जितकी जास्त शारीरिक हालचाल कराल, तितकी ऊर्जा शरीरासाठी आवश्यक आहे, `असं स्वान यांनी सांगितलं. `वर्कआउटमध्ये एखादा दिवस विश्रांती घेणंही गरजेचं असतं. कारण वर्कआउट आवश्यक असला, तरी वर्कआउट म्हणजे शरीरावर येणारा ताणच असतो. तुम्ही तुमच्या शरीराचं नुकसान करत राहिल्यास ते कधीही तंदुरुस्त होणार नाही,` असं स्ट्रॉंग वुमन ट्रेनिंग क्लबच्या ट्रेनर एम्मा ओबायुवना यांनी सांगितलं. लेविन याला सहमती दर्शवतात. `स्नायूंना आराम दिला नाही, तर त्यांना सूज येऊन दाह होऊ शकतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आणि झोपेवरही परिणाम होतो. थकवा जाणवतो. स्नायू थकून गेल्यास ते काम करू शकणार नाहीत. व्यायामामुळे शरीरावर ताण येतो. शरीरावर ताण आल्यास गुंतागुंत वाढते, त्यामुळे आठवड्यातले काही दिवस ट्रेनिंग किंवा व्यायाम न करणं अधिक चांगलं,` असं लेविन म्हणतात. कधी कधी नेहमीपेक्षा सोपे व्यायाम करण्याचा पर्यायही चांगला असल्याचं त्या म्हणतात.
First published:

Tags: Lifestyle, Types of exercise

पुढील बातम्या