जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care Tips - तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? या 6 टिप्स तुम्हाला करतील मदत

Skin Care Tips - तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? या 6 टिप्स तुम्हाला करतील मदत

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

त्वचेच्या पृष्ठभागाखाली जास्त प्रमाणात सेबम स्राव आणि अतिक्रियाशील तेल ग्रंथी असतात. ज्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात. हेच तेलकट त्वचेला कारणीभूत असतात. यामुळे पिम्पल्स आणि मुरूम होतात. जर तुम्हीही तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त असाल. तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जुलै : तेलकट त्वचा असलेल्या लोकांचा चेहरा कायम स्निग्ध असतो आणि त्यामुळे त्यांचा मेकअपही जास्त काळ टिकत नाही. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्माटोलॉजीच्या मते (American Academy of Dermatology), तेलकट त्वचा असणे ही अजिबात वाईट गोष्ट नाही, कारण सेबम (Sebum) आणि सेबेशियस ग्रंथी (Sebaceous Glands) फॅट्स आणि नैसर्गिक तेलाचे संरक्षण करतात. ज्यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळते आणि त्वचा रुक्ष होत नाही. तेलकट त्वचेचे कारण म्हणजे जास्त प्रमाणात सेबम स्राव आणि त्वचेच्या पृष्ठभागाखाली अतिक्रियाशील तेल ग्रंथी असणे. ज्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात आणि मग पिंपल्स, मुरुम होतात. जर तुम्हीदेखील तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त असाल. तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे दिलेल्या काही टिप्स चा वापर नक्की करा. सौम्य क्लींजर वापरा निरोगी त्वचेसाठी तुमचा चेहरा नियमितपणे धुणे आवश्यक आहे, परंतु जास्तवेळा चेहरा धुतल्यामुळे तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते. सौम्य क्लींजर (Use Gentle Cleanser) त्वचेला स्वच्छ करते आणि त्याचबरोबर मॉइश्चरायझेशन टिकवून ठेवते. प्रदूषक आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी तेलमुक्त आणि फेस होणाऱ्या क्लींजरने नियमितपणे तुमचा चेहरा स्वच्छ करावा. हेही वाचा…  Belly fat झटपट कमी करतो हा व्यायाम प्रकार; जाणून घ्या पद्धत आणि सर्व फायदे मॉइश्चरायझरचा वापरदेखील करा ऑइल-फ्री मॉइश्चरायझर त्वचेची छिद्रे बंद होऊ देत नाही किंवा त्यामुळे मुरुमदेखील येत नाही. उलट ते तुमच्या त्वचेचे पोषण करते (Use Oil Free Moisturizer) आणि त्यामुळे चेहऱ्यावर जास्त तेल येण्याची शक्यतादेखील कमी होते. त्यामुळे जर तुमची त्वचा तेलकट असेल तर ऑईल फ्री मॉइश्चरायझर वापर करा. दररोज सनस्क्रीन लावा जेव्हा त्वचा सूर्यप्रकाशामुळे ड्राय होते तेव्हा ती अधिक सेबम तयार करून प्रतिक्रिया देते. दररोज सनस्क्रीन (SPF 30+) लावल्याने रुक्ष आणि तेलकट त्वचा दोन्ही टाळता येते. (Use Sunscreen) एक्सफोलिएटिंग फेस मास्क वापरा त्वचेच्या मृत पेशी जेव्हा अतिरिक्त सेबम ऑईलसोबत मिसळतात तेव्हा त्या मोठी छिद्रे बंद करू शकतात आणि यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स होऊ शकतात. त्वचेच्या मृत पेशी हळुवारपणे काढून टाकण्यासाठी, आठवड्यातून किमान दोनदा एक्सफोलिएटिंग फेस मास्क (Exfoliating Face Mask) लावा. त्याचबरोबर त्वचेवर ताण जाणवत असल्यास अँटी-इंफ्लेमेटरी फेस मास्क (Anti-Inflammatory Face Mask) निवडा. हेही वाचा…  वजन कमी करायचंय? मग रोज सकाळी रिकाम्या पोटी या पद्धतीने प्या लिंबू पाणी टोनर वापरा टोनर वापरल्याने (Use Toner) तुमची त्वचा खोलवर स्वच्छ होते म्हणजेच डीप क्लीन होते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील चिकटपणादेखील दूर होतो. हातावर ब्लॉटिंग पेपर ठेवा दिवसभर ब्लॉटिंग पेपरचा वापर केल्यास त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकले जाऊ शकते (Use Blotting Paper). जास्तीचे तेल काढून टाकण्यासाठी ब्लॉटिंग पेपर तुमचे कपाळ, नाक आणि हनुवटी यांच्यावर हळूवारपणे ठेवा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात