Home /News /lifestyle /

Belly fat झटपट कमी करतो हा व्यायाम प्रकार; जाणून घ्या पद्धत आणि सर्व फायदे

Belly fat झटपट कमी करतो हा व्यायाम प्रकार; जाणून घ्या पद्धत आणि सर्व फायदे

तासभर व्यायाम केल्याने जितकी चरबी बर्न होणार नाही तितकी काही मिनिटे प्लँक्स करण्याने चरबी बर्न होईल. वजन कमी करण्यासाठी प्लँक हा एक प्रभावी व्यायाम (Exercises to reduce belly fat) आहे, शरीराला आतून मजबूत बनवतो.

    नवी दिल्ली, 29 मे : शरीराला फायदा होण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा असला तरी पोटाची चरबी जाळणे तसेच ऍब्स मिळवणे हे इतर नियमित व्यायामाच्या तुलनेत कठीण काम आहे. असा एक व्यायाम प्रकार आहे, ज्याद्वारे निश्चितपणे कोर स्ट्रेंथला फायदा होतो आणि पोटाची चरबी कमी होते, तो प्रकार म्हणजे प्लँक्स (Plank). सुमारे तासभर व्यायाम केल्याने जितकी चरबी बर्न होणार नाही तितकी काही मिनिटे प्लँक्स करण्याने चरबी बर्न होईल. वास्तविक, वजन कमी करण्यासाठी प्लँक हा एक प्रभावी व्यायाम (Exercises to reduce belly fat) आहे, जो तुमच्या शरीराला आतून मजबूत बनवतो. तुम्ही हा व्यायाम कुठेही, व्यायामशाळेत किंवा तुमच्या घरात करू शकता. तुमच्या वर्कआउट रूटीनमध्ये कधीही आणि कुठेही प्लँक्स केला जाऊ शकतो, जेणेकरून आपले पोट चरबीमुक्त (Benefits of Plank Exercise) होईल. आपल्या मुख्य स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्लँक्स हा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे. पोटाच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करणार्‍या प्लँक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे याद्वारे वरचे पोट, खालचे पोट आणि बाजू असे प्रकार असतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्लँक्स योग्य प्लँक्स करण्याचे तंत्र म्हणजे पोटाच्या स्नायूंवर (उदर आणि खालच्या दोन्ही स्नायूंवर) लक्ष केंद्रित करणे, जेणेकरून स्नायूंची क्रिया अधिक कार्यक्षमतेने कार्य करते. यामुळे खूप लवकर चांगले परिणाम दिसतात. याशिवाय प्लँक करताना आयसोमेट्रिक डोर्सिफलेक्‍शन केल्याने पोटाच्या स्नायूंच्या क्रियाकलापांना खूप फायदा होतो. Isometric dorsiflexion आपल्या शरीराला प्लँक्सच्या स्थितीत आणण्यासाठी फक्त पायांचा वापर होतो. हे वाचा - 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास कुठे प्लँक्स करू शकता प्लँक स्थिर पृष्ठभागावर म्हणजे फरशीवर किंवा सपाट भागावर आणि अस्थिर पृष्ठभागावरही करता येते. या दोघांमधील फरक असा आहे की फरशीवरील व्यायामाच्या तुलनेत अस्थिर पृष्ठभागावर करताना वाढीव कोर क्रियाकलाप आवश्यक आहेत. हे वाचा - शुक्र मेष राशीत असल्यानं या 5 राशीच्या लोकांचा सुकाळ; लक्झरी लाईफचा घ्याल आनंद प्लँक्स किती प्रकारचे असतात? या व्यायामाचे अनेक प्रकार आहेत, जसे फ्रंट प्लँक्स, वॉकिंग प्लँक्स, रिवर्स प्लँक्स, हिप एक्सटेंशनसोबत फ्रंट प्लँक्स, साइड प्लँक्स आणि साइड प्लँक्स एब्डक्शन. प्लँक्सचे असंख्य फायदे आहेत, परंतु हे फायदे मिळविण्यासाठी आपण प्लँक्स योग्य आसनात करणे महत्त्वाचे आहे, कारण चुकीच्या पद्धतीनं केल्यास या व्यायामाचे फायदे होण्याऐवजी आपल्याला दुखापत होऊ शकते. त्याची काळजी घ्या. या प्रकाराचे यूट्युबवरील व्हिडिओ पाहू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या