Home /News /lifestyle /

चेहऱ्यावर हळद लावत असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवा; नंतर साईड इफेक्ट वाढतात

चेहऱ्यावर हळद लावत असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवा; नंतर साईड इफेक्ट वाढतात

हळद त्वचेसाठी फायदेशीर असली तरी तिच्या वापरात केलेल्या काही चुकाही तितक्याच हानिकारक ठरू शकतात. जाणून घेऊया हळदीशी संबंधित काही खास गोष्टी ज्याकडे लक्ष दिल्यास तुम्ही हळदीचे दुष्परिणाम टाळू शकता.

    मुंबई, 29 मे : घरगुती उपचारांसोबत सौंदर्य वाढवण्यासाठी हळदीचा वापर सामान्यतः सर्व घरांमध्ये केला जातो. हळदीशिवाय जेवणाची चव जशी अपूर्ण असते, त्याचप्रमाणे स्त्रिया आणि पुरुषही त्वचा चमकदार बनवण्यासाठी हळदीचा वापर करतात. त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी बहुतेक लोक हळदीची पेस्ट लावतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की, हळदीचा चुकीचा वापर केल्याने तुमच्या त्वचेची समस्या कमी होण्याऐवजी वाढू (Turmeric side effects) शकते. हळद ही औषधी तत्वांनी समृद्ध मानली जाते. अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-टॅनिंग गुणधर्मांनी समृद्ध हळद, मुरुमे, पिंपल्स, टॅनिंग, सनबर्न आणि सुरकुत्या यांसारख्या त्वचेच्या समस्यांवर प्रभावी ठरते. हळद त्वचेसाठी फायदेशीर असली तरी तिच्या वापरात केलेल्या काही चुकाही तितक्याच हानिकारक ठरू शकतात. जाणून घेऊया हळदीशी संबंधित काही खास गोष्टी ज्याकडे लक्ष दिल्यास तुम्ही हळदीचे दुष्परिणाम टाळू शकता. चेहरा चांगला धुवा - हळद लावल्यानंतर अनेक वेळा आपण चेहरा व्यवस्थित धुत नाही आणि हळद चेहऱ्यावर राहते. त्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा आणि जळजळ होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावरील हळद धुवून काढल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. साबण लावणे टाळा - त्वचेवरील हळद काढून टाकल्यानंतरही चेहऱ्यावर थोडा पिवळसरपणा राहतो. त्यामुळे काही महिला साबण किंवा फेस वॉश लावतात. मात्र, असे केल्याने त्वचा काळी पडू लागते, त्यामुळे हळद काढण्यासाठी फक्त पाण्याने चेहरा धुवा, साबण-फेश वॉश वापरू नका. हे वाचा - टक्कल पडलेल्यांसाठी आशेचा किरण! या औषधामुळे सहा महिन्यात पुन्हा उगवणार केस हळदीच्या फेस पॅकमध्ये या चुका नको - हळदीचा फेस पॅक हा चेहऱ्यावर चमक आणण्याचा सर्वात नैसर्गिक मार्ग आहे. पण, काही स्त्रिया अधिक चमक आणण्यासाठी हळदीत वेगवेगळ्या गोष्टी मिसळून लावू लागतात. यामुळे चेहऱ्याला खूप नुकसान होऊ शकते. दुसरीकडे, हळद पावडर, गुलाब पाणी आणि दुधाने बनवलेला फेस पॅक त्वचेसाठी सर्वोत्तम मानला जातो. हे वाचा - फेस पॅक आणि फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा असा करा उपयोग, स्कीन होईल ग्लोइंग वेळेकडे दुर्लक्ष करू नका - हळदीचा फेस पॅक लावल्यानंतर अनेक महिला इतर कामात व्यग्र होतात आणि फेसपॅक बराच वेळ चेहऱ्यावर ठेवतात. जास्त वेळ हळद लावून ठेवल्याने जळजळ, लालसरपणा आणि पिवळे डाग येऊ शकतात. त्यामुळे हळदीची पेस्ट सुकल्यानंतर लगेच धुणे चांगले. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Lifestyle, Skin, Skin care

    पुढील बातम्या