मुंबई, 10 एप्रिल : चेहरा आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात. बहुतेक लोक सलूनमध्ये फेशियल (Facial) करवून घेण्यापासून ते स्पेशल स्किन केअर रूटीन (Skin Care Routine) फॉ़लो करण्यापर्यंत काहीही कमी राखत नाहीत. पण पाहिलं तर हे सर्व प्रयत्न फक्त क्लीन आणि ग्लोइंग फेस मिळवण्यासाठीच असतात. मात्र, आपल्याला हवे असल्यास, आपण घरी चेहरा क्लीन (Face Clean Up) करण्याचे काही सोपे मार्ग देखील करून (Skin Care Tips) पाहू शकता. वास्तविक, चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे चेहरा क्लीन करणं. फेस क्लीन अप योग्य प्रकारे करून तुम्ही केवळ चेहऱ्यावर चमक आणू शकताच, शिवाय चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स-पुरळ, सुरकुत्या, बारीक रेषा आणि डेड स्किन सेल्स घालवू शकता. जाणून घेऊया घरच्या घरी चेहरा क्लीन करण्याचे काही सोपे उपाय. दूध नॅचरल क्लिजिंग एजेंट कच्चं दूध चेहरा क्लीन करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी प्रथम कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या त्वचेच्या छिद्रांमधील सर्व घाण साफ होईल. त्यानंतर कच्च्या दुधाच्या मदतीने चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्याला वाफ घेणे स्टीमिंग देखील फेशियलचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि डेड स्किन सेल्स सहज निघून जातात. तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी देखील स्टीमिंग खूप महत्त्वाचे आहे. स्टीमिंगनंतर थोडावेळ चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे लावा. यामुळे तुमची सैल त्वचा घट्ट आणि चमकदार दिसेल. स्क्रबिंग प्रभावी चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी स्क्रबिंग खूप प्रभावी आहे. यासाठी गव्हाच्या पिठात लिंबाचा रस आणि दही मिसळून चेहऱ्यावर हलके मसाज करा. त्यानंतर 10-15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हे वाचा - Healthy राहण्यासाठी नक्की खायला हवेत हे 5 Vegetarian Food; मिळतात अनेक फायदे फेसपॅक लावा चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी फेसपॅक लावणे खूप गरजेचे आहे. फेसपॅक निवडताना तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात ठेवा. तुमची त्वचा तेलकट असेल, तर मुलतानी मातीचा फेस पॅक तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. दुसरीकडे, चंदन पावडर आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक लावणे कोरड्या आणि सर्वसामान्य त्वचेसाठी फायदेशीर आहे. टोनर लावायला विसरू नका फेस पॅक केल्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावायला विसरू नका. टोनर त्वचेची पीएच पातळी राखून ग्लो टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी तुम्ही गुलाबजल वापरू शकता. हे वाचा - उन्हाळ्यात चप्पल खरेदी करताना या गोष्टी ध्यानात ठेवा; नंतर पश्चाताप करावा लागतो मॉइश्चरायझर देखील लावा चेहऱ्यावर जास्त काळ ग्लो ठेवण्यासाठी चांगले मॉइश्चरायझर वापरा. शिवाय तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर तुमच्यासाठी अल्कोहोल आणि केमिकल फ्री मॉइश्चरायझर सर्वोत्तम ठरेल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.