Home /News /lifestyle /

Sandals For Summer: उन्हाळ्यात चप्पल खरेदी करताना या गोष्टी ध्यानात ठेवा; नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते

Sandals For Summer: उन्हाळ्यात चप्पल खरेदी करताना या गोष्टी ध्यानात ठेवा; नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते

Tips To Buying Perfect Sandals For Summer : सँडल खरेदी करताना लोक महत्त्वाच्या चुका करतात आणि नंतर पश्चात्ताप करत बसतात. उन्हाळ्यात योग्य चप्पल-सँडल खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई, 08 एप्रिल : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणं खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळा येताच हवामानात बदल होतो, उन्हाळी कपड्यांबरोबरच चप्पल-सँडलची (Footwear) योग्य निवड केल्यास आरामदायी फिल यतो. पण, उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक परफेक्ट सँडल खरेदी करणं, तितकं सोपं काम नाही. सँडल खरेदी करताना लोक महत्त्वाच्या चुका करतात आणि नंतर पश्चात्ताप करत बसतात, असं सर्वसाधारणपणे दिसून येतं. उन्हाळ्यात योग्य चप्पल-सँडल खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या याविषयी जाणून (Tips To Buying Perfect Sandals For Summer) घेऊया. कशासाठी वापरणार आहात ते आधी फिक्स करा खरेदी करण्यापूर्वी विचार करा की, ते तुम्ही कुठे वापरणार आहात. म्हणजे फॉर्मल इवेंटसाठी किंवा घरी-बाहेर फिरताना घालण्यासाठी किंवा आणि कोणत्या प्रसंगी घालण्यासाठी. जर तुम्हाला रिलॅक्स वाटावं यासाठी सँडल खरेदी करायची असेल तर स्टायलिश टाचांच्या सँडलऐवजी तुम्ही कंफर्टेबल सँडल खरेदी करा. तुम्ही ऑफिस किंवा पार्टीसाठी खरेदी करत असाल तर फॉर्मल सँडल खरेदी करा. कंफर्टेबल सर्वात महत्त्वाचं - उन्हाळ्यातील सँडल खरेदी करताना आधी कंफर्टेबल काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही उन्हाळ्यात कुठेतरी बाहेर फिरायला जात असाल, तर सँडल निवडताना लुकपेक्षा कम्फर्टवर जास्त भर द्यावा. आउटिंगसाठी उंच टाचांची खरेदी करणे योग्य ठरणार नाही. आकाराची विशेष काळजी घ्या सँडल निवडताना फार घट्ट होणार नाही आणि ढिलीही राहणार नाही, याची काळजी घ्या. योग्य आकार आणि माप यात कसलाच कॉम्प्रोमाइज नको. जर तुम्ही तुमच्या पायाच्या आकारापेक्षा लहान चप्पल घेतलीत तर चालताना पायाला इजा होऊ शकते, मोठी झाली तर चालताना त्रास होतो, पाय दुखतात. हे वाचा - Weight Loss : पोटॅशियमनं समृद्ध या पदार्थांचा आहारातील समावेश झटपट करेल वजन कमी आपली स्टाईल तुम्हाला स्वतःसाठी कोणत्या स्टाईलच्या सँडल घ्यायच्या आहेत हे आधीच ठरवा. उदाहरणार्थ, ग्लॅडिएटर्स, प्लॅटफॉर्म, स्लाइड्स आणि वेजेस इ. कोणतीही चप्पल निवडण्यापूर्वी आपलं व्यक्तिमत्व आणि शैलीचाही विचार करणं चांगलं. हे वाचा - ब्युटीऐवजी 'त्या' Men Productsच्या जाहिरातीसाठी उतावळी महिला; धक्कादायक आहे कारण गुणवत्तेला प्रथम प्राधान्य नेहमी चांगल्या दर्जाच्या सँडल घ्या. तुम्ही खूप महाग सँडल विकत घेतलेच पाहिजे, असे नाही. पण स्वस्त सँडल खरेदी करून कंफर्टेबलशी तडजोड करू नका.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fashion, Summer, Summer season

    पुढील बातम्या