मुंबई, 29 एप्रिल : उन्हाळ्यात ऊन, धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम सर्वांच्या त्वचेवर होत असतो. उन्हाळ्यात महिलांसोबत पुरुषांनाही त्वचेची विशेष (Skin care for men) काळजी घेण्याची गरज असते. ज्यामध्ये पहिले काम असते त्वचा स्वच्छ ठेवणे. खरं तर, चेहरा घाण आणि ऑयली फ्री ठेवणे विशेषतः उन्हाळ्यात पुरुषांसाठी खूप कठीण काम आहे. पण, बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने तुमच्यासाठी हे काम सोपे (Summer season) होऊ शकते.
थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेची पीएच पातळी कायम राहते. बर्फाच्या पाण्याने चेहरा धुणे देखील विशेषतः पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. बर्फाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे विशेष फायदे जाणून घेऊया.
छिद्रे आकुंचन पावतील -
उन्हाळ्यात चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलामुळे त्वचेवरील बारीक छिद्रे उघडू लागतात. अशा स्थितीत बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा तर कमी होतोच, शिवाय जास्त उघडली गेलेली छिद्रेही आकुंचन पावू लागतात.
सूज आणि जळजळ कमी होईल -
तुमच्या चेहऱ्यावर सूज येत असेल तर बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते. असे केल्याने सूजही कमी होऊ लागते. त्याचबरोबर बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने टॅनिंग आणि सनबर्नपासूनही आराम मिळतो.
ओलावा कायम राहील -
उन्हाळ्यात ऊन आणि धुळीमुळे त्वचा कोरडी पडते. थंड पाणी त्वचेचे ट्रांसएपिडर्मल लॉस रोखण्यासाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्यात बर्फाच्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्वचेची आर्द्रता टिकून राहते.
हे वाचा -
10 वर्षात लाखों भारतीय झालेत HIV पॉजिटिव, बचावासाठी या टिप्स नेहमी ध्यानात ठेवा
सीबममध्ये वाढ -
उन्हाळ्यात चेहऱ्यावर मुरुमे आणि पिंपल्स येण्याची समस्या वाढते. ज्याचे मुख्य कारण म्हणजे उष्णतेमुळे चेहऱ्यावर सेबम कमी पडतं. अशा परिस्थितीत, बर्फाचे पाणी चेहऱ्यावरील सेबमचे प्रमाण वाढवून पिंपल्स आणि मुरुमे कमी करण्यास मदत करते.
हे वाचा -
मे महिना या 5 राशीच्या लोकांसाठी राहील खास; नोकरी-धंद्यात बक्कळ कमाईचे योग
सुरकुत्या निघून जातील -
चेहऱ्यावर सुरकुत्या येणं हे वृद्धत्वाचे लक्षण आहे. पण उन्हाळ्यात अनेकदा सुरकुत्या वाढू लागतात. कोमट/गरम पाण्याने चेहरा धुतल्याने सुरकुत्या वाढू लागतात. त्यामुळे सुरकुत्या कमी करण्यासाठी बर्फाच्या पाण्याने चेहरा धुणे हा उत्तम पर्याय आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.