नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : वाढत्या वयासोबत (Growing Age) सौंदर्य जपणं (Beauty Care) आणि आरोग्याची काळजी घेणं (Health Care) अशी दुहेरी कसरत अनेक जण करतात. तरुण (Younger) दिसण्यासाठी विविध उपायही केले जातात. आज आम्ही अशा एका ‘जादुई’ चहाबाबत सांगणार आहोत, जो नियमित प्यायल्यानं तरुण दिसण्याचं उद्दिष्ट साध्य होईल. हा ‘जादुई’ चहा म्हणजे जास्वंदीचा (Hibiscus Tea) चहा. चेहऱ्याची चमक आणि फिटनेस पाहून बाकीच्या व्यक्ती वयाचा अंदाज लावतात. प्रत्येकाला वृद्धत्वाची चिंता असते आणि प्रत्येक जण सतत तरुण दिसण्यासाठी त्वचेची काळजी घेत असतो; पण तुम्हाला माहिती आहे का, असे अनेक नैसर्गिक मार्ग आहेत, ज्यांच्या मदतीने चमकदार आणि डागरहित त्वचा मिळवता येते. पांढऱ्या चहाविषयी तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या काय आहेत फायदे! निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी प्या जास्वंदीचा चहा जास्वंद ही केवळ शोभेची वनस्पती नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठीही या वनस्पतीचा वापर केला जातो. या वनस्पतीमध्ये अँटीफर्टिलिटी, अँटीमाइक्रोबियल, अँटीअल्सर, अँटीजनोटॉक्सिक, अँटीऑक्सिडेंट, अँटीडायबिटिक, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्वचेची काळजी घेण्यासाठीही यात महत्त्वपूर्ण गुणधर्म असतात. असा बनवा जास्वंदीचा चहा जास्वंदीचा चहा बनवण्यासाठी सर्वांत प्रथम 2 कप ताजी किंवा वाळलेली जास्वंदीची फुलं घ्या. त्यामध्ये 8 कप पाणी घाला. चहासाठी जास्वंदीची ताजी फुलं वापरत असाल, तर फुलांच्या देठाशी असलेला हिरवा भाग काढून टाका. वाळलेली फुलं वापरत असाल, तर फुलांच्या देठाशी असणारा हिरवा भाग काढण्याची गरज नाही. एका मोठ्या भांड्यात जास्वंदीची फुलं आणि पाणी उकळवा. पाणी उकळायला लागल्यावर गॅस बंद करून भांडं झाकून ठेवा. यामध्ये तुळस, गवती चहा आदी औषधी वनस्पतीसुद्धा घालू शकता. हा चहा चांगला उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये पाव कप मध व 3 चमचे ताज्या लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर चहा गाळून घ्या. हा चहा गरमागरम सर्व्ह करू शकता किंवा फ्रीजमध्ये काही तास ठेवू शकता. जास्वंदीचा चहा पिण्याचे फायदे - अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली जास्वंदीची फुलं निरोगी कोलॅजन लेव्हल वाढवतात व त्वचा मजबूत करतात. हा गुणधर्म हायपरपिग्मेंटेशन असलेल्यांना मदत करू शकतो. जास्वंदीमध्ये मायरिसेटिन नावाचं संयुगदेखील आहे, जे कोलॅजनचा ऱ्हास होण्याचा वेग कमी करू शकतं. - जास्वंद कोणत्याही प्रकारच्या स्किनचा टोन, हायपरपिग्मेंटेशन, काळे डाग कमी करण्यासाठी तात्काळ उपाय म्हणून काम करतं. त्याचे गुणधर्म त्वचेचा टोन सुधारून पेशींचं पोषण करतात. - जास्वंदामध्ये अँथोसायनिन नावाचे अँटिऑक्सिडंट असतात. ते फुलाला गुलाबी-लाल रंग देतात. त्यामुळे फुलांना अँटी इनफ्लेमेटरी गुणधर्मही मिळतात. ते ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतात. - जास्वंद चहा शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठीदेखील घेतला जातो. त्याच्या हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे, ते त्वचेला कोमल बनवतं, मॉइश्चरायझेशन करतं आणि त्वचेमध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. - जास्वंद चहा नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करतो. शरीरातलं कोलॅजनचं उत्पादन वाढू शकतं आणि यूव्हीबी (UVB) किरणोत्सर्गाच्या जास्त संपर्कामुळे होणारं मेलॅनिन संश्लेषण कमी करू शकतं. सौंदर्य आणि आरोग्यविषयक सर्व अपेक्षा पूर्ण करणारा एखादाच उपाय असावा, असं अनेकांना वाटत राहातं. असा उपाय म्हणजेच जास्वंदीच्या फुलाचा चहा पिणं हा होऊ शकतो. फक्त तो योग्य पद्धतीने बनवणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.