मुंबई, 26 डिसेंबर : 'ए.. मी माझ्या मम्मीला किंवा पप्पांना नाव सांगेन हा तुझं?', कोणत्या मित्रमैत्रिणीनं त्रास दिला की लहान मुलं आपल्या पालकांची धमकी देतात. पण पालकांवरच हे मूल रूसलं असेल, रागावलं असेल तर. फारफार तर आजी-आजोबांकडे त्यांची तक्रार जाते. पण एका चिमुरड्याने थेट पोलिसांचीच धमकी दिली. इतकंच नव्हे तर त्याने पोलिसांना फोनही लावण्याचा प्रयत्न केला. या चिमुरड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
आयपीएस आर. के. व्हिज यांनी आपल्या ट्विटरवर एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा मुलगा आपल्या पालकांवर रागावला आहे आणि संतापलेल्या या मुलानं पालकांना पोलिसांचीच धमकी दिली आणि पोलिसांना फोन डायल केला.
व्हिडीओतील संवादानुसार मुलाचे पालक त्याच्याशी बोलत नाही आहेत. त्यामुळे त्याला राग आला आहे. तुम्ही माझ्याशी बोलत नाहीत ना मी आता पोलिसांनाच फोन लावतो, अशी धमकी हा मुलगा आपल्याशी अबोला धरलेल्या पालकांना देतो आहे. अगदी शर्ट्सचे स्लीव्ह्ज वगैरे वर करत तो फोन हातात घेतो, नंबर डायल करतो आणि कानालाही लावतो.
पोलिसांची धमकी देतात त्याचे पालकही घाबरतात आणि त्याला विनवणी करतात ही पोलिसांना फोन करू नको आम्ही तुझ्याशी बोलतो.
शुक्र है किसी को तो पुलिस पर विश्वास है। 😂
बेटा 112 डायल करो। 😂 https://t.co/cLI2KQIxDy
— RK Vij, IPS (@ipsvijrk) December 24, 2020
हा मजेशीर व्हिडीओ पाहताच आर के व्हिज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणालातरी पोलिसांवर विश्वास आहे. बेटा 112 डायल कर, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
हे वाचा - भारीच! बाळाचं ठेवलं हटके नाव; आता 2080 सालापर्यंत खायला मिळणार FREE PIZZA
दरम्यान एखाद्या चिमुरड्याने मोठ्या व्यक्तीला अशी धमकीदेण्याचा हा पहिलाच व्हिडीओ नाही. नोव्हेंबरमध्येदेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एका लहान मुलानं न्हाव्यालाच धमकी दिली होती. अनुश्रुत असं या मुलाचं नाव. हा मुलगा नागपूरचा असल्याची माहिती आहे.
त्याला सलूनमध्ये केस कापण्यासाठी बसवलं जातं, पण इतर मुलांप्रमाणेच त्यालाही केस कापायचे नाही. केस कापताना त्याचाही डोळ्यात पाणी येतं, तो रडतो हे स्पष्ट दिसतं. केस कापण्यापासून त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी न्हावी त्याच्याशी गप्पा मारतो, त्याला प्रश्न विचारतो. तर उलट मुलगा त्यालाच धमकी देतो. अरे क्या कर रहे हो, मेरे पुरे बाल काट दोगे, अरे बाल क्यो काट रहे हो. गुस्सा आ राहा है, तुम्हारे सारे बाल काट दुंगा, असं न्हाव्यालाच रागात म्हणतो.
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा - 'अरे क्या कर रहे हो', केस कापताना चिमुरड्यानं न्हाव्यालाच दिली धमकी, VIRAL VIDEO एकदा पाहाच
अनुश्रुतच्या वडिलांनीच त्याचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी, प्रत्येक आई-वडिलांना या गोष्टीचा सामना करावा लागतो असं म्हटलंय.