मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कारचं बोनेट उघडलं आणि चालकाची बोबडीच वळली, नेमकं काय घडलं पाहा थरारक VIDEO

कारचं बोनेट उघडलं आणि चालकाची बोबडीच वळली, नेमकं काय घडलं पाहा थरारक VIDEO

कारच्या बोनेटमध्ये अजगर वेटोळं करून बसला होता. त्याला पाहून चालकाची तर झोपच उडाली.

कारच्या बोनेटमध्ये अजगर वेटोळं करून बसला होता. त्याला पाहून चालकाची तर झोपच उडाली.

कारच्या बोनेटमध्ये अजगर वेटोळं करून बसला होता. त्याला पाहून चालकाची तर झोपच उडाली.

  • Published by:  Kranti Kanetkar
आगरा, 26 डिसेंबर : कारचं बोनेट उघडलं आणि चालकाची बोबडी वळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना घामाच्या धारा वाहू लागल्या आणि हात थरथर कापू लागले. समोर वेटोळ करून 4 फूट अजगर बसला होता हे पाहून त्याची झोपच उडाली. अनेकदा दुचाकीमध्ये, गाडीच्या चाकात साप अडकल्याच्या घटना समोर येत असतात. गाडीच्या बोनेटमध्ये 4 फूटांचा लांब अजगर सापडल्यानं खळबळ उडाली आहे. चालकानं याची माहिती वन विभागाला तातडीनं कळवली आणि या अजगराला गाडीतून काढण्यासाठी मदत मागितली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे लोक घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे वाचा-OMG! गायीच्या पोटालाच बनवली स्क्रिन, अख्खा गाव पाहात होता फिल्म उत्तर प्रदेशातील आग्रा इथल्या सिकंद्रा परिसरातील गलना रोड इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. कारच्या मालकाने काही कारणास्तव कारचे बोनेट उघडले. बोनेट उघडताच त्या आत वेटोळं करून बसलेला अजगर दिसला. या घटनेनं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरातील सदस्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचत त्यांनी अर्धा तासात या अजगराला रेस्क्यू केलं आहे. या अजगराला सुखरुपपणे रेस्क्यू केलं असून जवळच्या जंगलात सोडण्यात येणार आहे. सुदैवानं या अजगरानं कोणालाही दुखापत केली नाही. मात्र हा अजगर इथपर्यंत कसा पोहोचला असा प्रश्न आहे. याआधी गाडीच्या चाकात अडकलेल्या अजगराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
First published:

Tags: Uttar pradesh, Viral video.

पुढील बातम्या