व्हिडीओत पाहू शकता, 27 वर्षांची सोफिया बॉयफ्रेंड अल्वारो सोलरच्या समोर बसली आहे. त्यांनी ख्रिसमसची सजावट केलेली आहे. ख्रिसमस ट्री सजावा आहे. काही कँडल्सही लावले आहेत. अल्वारो ख्रिसमस कॅरोल गायला सुरुवात करतो आणि सोफिया त्याला साथ देते. गाणं गाता गाता ती पुढे मागे होते. तिच्या पाठीमागे टेबलवर मेणबत्त्या पेटत असतात. सोफियानं केस सोडलेले आहेत. जेव्हा ती मागे होते तेव्हा तिचे केस पेटत्या मेणबत्तीला लागतात आणि त्यांना आग लागते. हे वाचा - इतकी हवा भरली इतकी हवा भरली की बॉम्बसारखा फुटला टायर आणि.... धडकी भरवणारा VIDEO सुरुवातीचे काही क्षण सोफियालाही समजत नाही की तिच्या केसांना आग लागली आहे. जेव्हा ती पुन्हा थोडी मागे होते आणि तिचे केस तिच्या पाठीला लागतात तेव्हा तिला गरम काहीतरी लागतं. मागे वळून पाहते तर तिच्या केसांना पेट घेतलेला असतो. सोफिया आणि अल्वारो दोघंही घाबरतात. सोफिया ओरडतच उठते. अल्वारोही लगेच उठतो आणि सोफिया केसांवरील आग हातानंच विझवण्याचा प्रयत्न करतो. हे वाचा - भारीच! मुलाचा Belly dance video व्हायरल; पाहताच म्हणाल याच्यासमोर तर शकिराही फेल सुदैवानं आग विझते आणि सोफिया तिथून पळतच सुटते. त्याचवेळी शॅम्पिअनचा ग्लासही पडतो. सोफिया आणि अल्वारोचं वेळीच लक्ष गेल्यानं त्यांच्या जीवाला मोठी हानी पोहोचली नाही. व्हिडीओ पोस्ट करताना सोफियानं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, "2019 आम्ही चांगले होतो. 2020 मध्ये आम्ही आग लावली आणि ग्लास तोडले. हेलो 2021". यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral videos