मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips : घरातील फरशी पुसताना कमी होईल वजन, साफसफाई करताना करा या एक्सरसाइज

Weight Loss Tips : घरातील फरशी पुसताना कमी होईल वजन, साफसफाई करताना करा या एक्सरसाइज

photo credit : canva

photo credit : canva

आपण घरातील कामे करण्यात खूप वेळ आणि मेहनत खर्च करतो. मग यामध्ये थोडासा बदल करून जर आपण आपले वाजवी कमी करू शकलो तर? पाहूया यासाठी काही टिप्स.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 नोव्हेंबर : वजन वाढणे ही एक समस्या आहे, ज्याचा बऱ्याच लोकांना खूप त्रास होतो. वजन कमी करण्यासाठी काही लोक खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. कोणी जिममध्ये जाते, कोणी घरीच एक्सरसाइज करतात, तर कोणी योगासने करतात. परंतु व्यस्त दिनचर्या आणि कामामध्ये व्यायामासाठी वेळ काढणे ही अशी गोष्ट आहे, जी काही लोकांना शक्य नसते.

काही लोकांना घरातील काम आणि ऑफिसचे काम यांच्यामधून व्यायामासाठी वेळच मिळत नाही. एवढी कामं केल्यानंतर शरीर व्यायामासाठी अनेकदा साथही देत नाही. अशा लोकांसाठी आज आम्ही एक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. तुम्ही घरातील कामे करण्यात बराच वेळ आणि मेहनत खर्च करता, तेव्हा हेच काम प्रभावी व्यायामात आपण बदलू शकलो तर? आज आम्ही तुम्हाला घराची साफसफाई करतात सहज शक्य असणाऱ्या काही व्यायामाबद्दल माहिती देणार आहोत.

Health Tips: फक्त रोगप्रतिरशक्ती वाढवण्यासाठीच नाही तर स्लिम अन् फिट ठेवण्यासाठीही गुळवेल उपयुक्त

घराची साफसफाई हे अनेक लोकांसाठी रोजचे काम आहे. काही लोक अशा कामासाठी इतर लोकांची मदत घेतात. मात्र घराची साफसफाई हा एक उत्तम व्यायाम आहे. आपण स्वतःच घराची साफसफाई करणे हे वजन कमी करण्याची निश्चितच फायदेशीर ठरू शकते. खालील दोन व्यायाम उभे राहून मॉपद्वारे फरशी पुसणाऱ्यांसाठी आहेत. मात्र खाली बसून, वाकून हातात कापड घेऊन फरशी पुसल्याने खूप फायदा होतो. यामुळे स्क्वॅट्स केल्या जातात आणि याचा जास्त फायदा होतो.

व्यायाम प्रकार 1 : जे उभे राहून मॉपद्वारे घराची फरशी पुसतात. त्यांच्यासाठी हा व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम करण्यासाठी फरशी पुसताना सरळ उभे रहा. यानंतर, गुडघे वाकवून स्क्वॅट्सच्या स्थितीत या. नंतर उभे राहा आणि आपला उजवा पाय पसरवा. यानंतर परत सरळ उभे रहा. नंतर स्क्वॅट्सच्या स्थितीत या आणि डावा पाय पसरवा. फरशी पुसताना जितक्यावेळा जमेल याची पुनरावृत्ती करा. याने वजन कमी होण्यास मदत होईल.

व्यायाम प्रकार 2 : दुसऱ्या प्रकारच्या व्यायामासाठी सर्व प्रथम सरळ उभे रहा. आपल्या उजव्या हातात मॉप धरा. आता तुमच्या डाव्या पायाचा गुडघा वाकवा आणि पाय वरच्या दिशेने आणा आणि गुडघा पुढे आणा. आता तुमचा सरळ पाय म्हणजेच उजवा पाय मोपसह ठेवा. आता सरळ स्थितीत परत या. ज्यापद्धतीने डाव्या पायाने हा व्यायाम केला त्याच पद्धतीने उजव्या पायानेही करा. हेदेखील वजन कमी करण्यास मदत करेल.

कंबर स्लीम बनवायची असेल तर नाश्त्यात करा हे 5 बदल, लगेच फरक दिसू लागेल

अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, अगदी लहान व्यायामामुळे स्नायूंची ताकद वाढू शकते. अनेकांना वाटतं की त्यांनी व्यायामासाठी बराच वेळ द्यावा. पण तो समज चुकीचा आहे. लहान आणि मध्यम व्यायामामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात. तसेच शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. व्यायाम करताना तुम्ही कोणते कपडे घालता, तुम्ही किती स्नॅक्स खातात, तुम्ही किती पाणी पितात आणि तुमच्या शरीरात होणारे बदल याकडेही लक्ष दिले पाहिजे.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Types of exercise, Weight loss tips