जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Winter Health Care : रात्री स्वेटर घालून झोपणे पडेल महागात! झोपेतच जडतील हे आजार

Winter Health Care : रात्री स्वेटर घालून झोपणे पडेल महागात! झोपेतच जडतील हे आजार

रात्री स्वेटर घालून झोपणे पडेल महागात!

रात्री स्वेटर घालून झोपणे पडेल महागात!

थंडीचा कहर टाळण्यासाठी अनेकजण रात्री स्वेटर घालून झोपतात. यामुळे शरीराला फायदा होईल असे त्यांना वाटते, पण तसे नाही. रात्री स्वेटर घालणे हानिकारक ठरू शकते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जानेवारी : सतत घसरत्या तापमानामुळे थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक थरांचे उबदार कपडे घालून घराबाहेर पडत आहेत. थंडी टाळण्यासाठी काही लोक रात्रीही उबदार कपडे घालून झोपतात. मात्र तुम्हाला माहितीये? असे रात्री गरम कपडे घालून झोपणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. रात्री गरम कपडे परिधान केल्याने रक्ताभिसरण तर मंदावतेच पण त्वचेशी संबंधित आजारही होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही रात्री स्वेटर घालून का झोपू नये आणि तसे झोपल्यास काय काय दुष्परिणाम होऊ शकतात.

ब्लड शुगर नियंत्रित करण्यापासून कॅन्सरचाही धोका करते कमी, वाचा मलबेरीचे फायदे

त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात एचटीच्या रिपोर्टनुसार, रात्री उबदार कपडे परिधान केल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. रात्री उबदार कपडे घालून झोपल्याने शरीरात ओलावा कमी होतो. अशावेळी तुम्हाला एक्जिमा, खाज सुटणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय मोजे घालून झोपल्यामुळे बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.

News18लोकमत
News18लोकमत

रक्तदाब वाढवते रात्री स्वेटर किंवा इतर उबदार कपडे घालून झोपल्यानेही रक्तदाब वाढतो. रात्रीच्या वेळी स्वेटर किंवा उबदार कपड्यांमुळे घाम येऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. अशा परिस्थितीत रात्री सामान्य कपडे घालून झोपण्याचा सल्ला दिला जातो. हवेचे परिसंचरण कमी होते थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण सहसा स्वेटर किंवा उबदार कपडे वापरतो. कधी कधी अति थंडीमुळे आपण रात्रीच्या वेळीही स्वेटर घालून झोपणे योग्य समजतो. परंतु स्वेटर किंवा उबदार कपडे घालून झोपल्याने शरीरातील हवेचा दाब कमी होतो, त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. जर आपण जास्त वेळ स्वेटर किंवा उबदार कपडे घालून झोपलो तर आपल्याला हृदयाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. Strawberry Benefits : वेट लॉससोबत हाडंही मजबूत करते स्ट्रॉबेरी, ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल! इतर गरम कपड्यांमुळेही होते नुकसान सर्दी टाळण्यासाठी रात्रीही स्वेटर घालूनच झोपत असाल तर उबदार कपड्यांचे तंतूही कमजोर होतात. तंतूंच्या कमकुवतपणामुळे कपड्यांचा टिकाऊपणा कमी होतो. रात्रीच्या वेळी थंडी टाळण्यासाठी ब्लँकेट किंवा रजाई वापरणे चांगले. तुम्हाला अजूनही उबदार कपडे घालून झोपायचे असेल तर झोपण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर लावा आणि हलके स्वेटर किंवा उबदार कपडे घालून झोपा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात