मुंबई, 11 जानेवारी : हिवाळयात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारावर खूप लक्ष द्यावे लागते. काही पदार्थ हिवाळ्यात आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. असेच एक फळ आहे मलबेरी. मलबेरी हे फळ तुमच्या केवळ एका नव्हे तर अनेक समस्यांवर उपाय ठरू शकते. चला तर मग जाणून घ्या मलबेरीचे जबरदस्त फायदे. मलबेरी लोहाची कमतरता पूर्ण होते. त्यात रिबोफ्लेविन असते, जे तुमच्या ऊतींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते. लाइफस्टाइल कोच प्रशिक्षक डॉ. स्नेहल अलसुले अनेकदा त्यांच्या सोशल मीडियाद्वारे आरोग्य आणि आहाराशी संबंधित माहिती शेअर करतात. एका पोस्टमध्ये त्यांनी मलबेरीचे फायदे सांगितले आहेत.
Strawberry Benefits : वेट लॉससोबत हाडंही मजबूत करते स्ट्रॉबेरी, ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल!रक्तातील साखर नियंत्रित करते हरजिंदगीमध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार, टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांच्या रक्तातील साखरेमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक असते. मलबेरीमध्ये 1-deoxynojirimycin (DNJ) हे कंपाऊंड असते. हे कंपाउंड आतड्यात कार्बोहायड्रेट्सचे विघटन करणारे एंजाइम रोखते, त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी करून तुती मधुमेहाविरूद्ध फायदेशीर ठरू शकतात.
कोलेस्टेरॉल कमी करते कोलेस्टेरॉल हा शरीरातील पेशीमध्ये असलेला महत्त्वाचा फॅटी मॉलिक्यूल आहे. मात्र रक्तातील उच्च कोलेस्टेरॉलच्या पातळीमुळे हृदयविकाराची जोखम वाढू शकते. काही अभ्यासांमध्ये असे सुचवण्यात आले आहे की, मलबेरी जास्तीचे फॅट्स आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. पचनशक्ती वाढवते मलबेरीचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. जर तुम्हाला पोटदुखी असेल किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर मलबेरीचा रस जरूर प्या. यामध्ये असणारे फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवते आणि अशावेळी पोटाच्या समस्या होत नाहीत. रोगप्रतिकारशक्ती वाढवते मलबेरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. स्मरणशक्ती सुधारते मलबेरीमध्ये आढळणारे ग्लायफोसेट मेंदूला निरोगी ठेवते आणि तीक्ष्ण बनवते. तसेच तणाव निर्माण करणाऱ्या घटकांना रोखण्याचा प्रयत्न करते. मलबेरी खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. दृष्टी वाढवते मलबेरी एका अँटिऑक्सिडंटप्रमाणे काम करतात ज्यामुळे दृष्टी वाढते. यासोबतच डोळ्यांच्या संसर्गापासूनही संरक्षण करते. मोतीबिंदू सारख्या आजारात मलबेरी खाणे खूप फायदेशीर आहे.
हिवाळ्यात हाडांना असते जास्त पोषणाची गरज, आहारात नक्की सामील करा हे पदार्थकर्करोगाचा धोका कमी करते पांढर्या मलबेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, अल्कलॉइड्स आणि फिनोलिक अॅसिड्ससह कर्करोगाशी लढा देणारे विविध अँटिऑक्सिडंट असतात. तुमच्या शरीरातील वाढलेल्या ताणामुळे पेशी आणि ऊतींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. कर्करोगावर उपाय म्हणून शेकडो वर्षांपासून मलबेरी पारंपारिक चीनी औषधांचा एक भाग आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)