Home /News /lifestyle /

Ginger Side Effects: औषधी गुणधर्म आहे आलं; पण जास्त खाल तर होतील गंभीर दुष्परिणाम

Ginger Side Effects: औषधी गुणधर्म आहे आलं; पण जास्त खाल तर होतील गंभीर दुष्परिणाम

आल्याचा वापर केवळ मसाल्यांमध्येच केला जातो असे नाही. तर हजारो वर्षांपासून अनेक संस्कृतींमध्ये आलं म्हणजेच अद्रक हा एक पारंपारिक उपचार म्हणून वापरले जाते. परंतु आल्याच्या अतिसेवनाचे काही साइड इफेक्ट्सदेखील (Ginger Side Effects) होऊ शकतात.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 मे : आपल्या घरात अनेक मसाल्याचे पदार्थ असतात. 'आलं' (Ginger) हा त्यांपैकीच एक आहे. आल्याचा वापर आपण भाजी बनवण्यात, चहामध्ये आणि काही पेयांमध्ये करत असतो. आले केवळ मसाल्यांच्या स्वरूपातच नाही तर हजारो वर्षांपासून अनेक संस्कृतींमध्ये आले हा एक पारंपारिक उपाय म्हणून वापरला जातो. उत्तम आरोग्यासाठी लागणारे सर्व घटक आल्यामध्ये आहेत. आल्याचे असंख्य फायदे असले. तरीदेखील त्याचे काही साइड इफेक्ट्सदेखील (Ginger Side Effects) होऊ शकतात. आज आपण आल्यामुळे होऊ शकणाऱ्या समस्यांबद्दल बोलणार आहोत. सहसा आल्याच्या अतिसेवनानंतरच त्याचे साइड इफेक्ट्स होतात. परंतु काही प्रकरणांमध्ये हे साईड इफ्फेक्टस गंभीररीत्या वाढलेले दिसतात. जाणून घेऊया आल्याच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या काही गंभीर परिणामांबद्दल. रक्तस्त्राव होणे आल्यामध्ये अँटीप्लेटलेट गुणधर्म असल्याने त्याचे जास्त सेवन केल्यास रक्तस्त्राव (Bleeding) होऊ शकतो. इतकंच नाही तर लवंग किंवा लसूण यांच्यासोबत आले खाल्ल्यास जास्त रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. हेही वाचा... Medicine without Doctors Prescriptions : डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायच खरेदी करता येणार ही 16 औषधं; पाहा सविस्तर यादी अतिसार किंवा डायरिया होणे जास्त प्रमाणात आल्याचे सेवन केल्याने आतड्यांमधून अन्न आणि मल बाहेर जाण्यास गती निर्माण होते. त्यामुळे अतिसार किंवा डायरिया (Diarrhea) होतो. अनेकदा अस्वस्थता आणि अशक्तपणादेखील जाणवतो. हृदयाच्या समस्या जास्त प्रमाणात आल्याचे सेवन केल्याने अनेकदा विपरीत परिणाम (Heart Problems) होतात. आल्याच्या अतिसेवनामुळे अनेकदा डोळ्यांना अस्पष्ट दिसणे, हृदयाची स्पंदने वाढणे, आणि निद्रानाश अशा समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे रक्तदाबदेखील कमी होऊन हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याची शक्यता असते. हेही वाचा... घरात सारखी होतात कोळ्यांची जाळी? हे जालीम उपाय करून बघा, परत नाहीत होणार त्वचा आणि डोळ्यांना अ‍ॅलर्जी होणे आल्याच्या अतिसेवनामुळे उद्भवणाऱ्या मूलभूत दुष्परिणामांची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे त्वचेवर पुरळ उठणे, डोळ्यांचा लालसरपणा, श्वास लागणे, खाज सुटणे, ओठ सुजणे, डोळ्यांना खाज येणे आणि घशातील खवखव ही (Skin Allergy Due To Ginger) आहेत. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. गर्भधारणेदरम्यान आले खाणे टाळावे दररोज 1500 मिलीग्रामच्या मर्यादेपेक्षा आल्याचे सेवन केल्यास गर्भपात (Ginger Can Cause Miscarriage) होण्याचा धोकादेखील संभवतो. त्यामुळे गरोदरपणात आले खाणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करावे.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Food, Health Tips

    पुढील बातम्या