Home /News /lifestyle /

Medicine without Doctors Prescriptions : डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायच खरेदी करता येणार ही 16 औषधं; पाहा सविस्तर यादी

Medicine without Doctors Prescriptions : डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायच खरेदी करता येणार ही 16 औषधं; पाहा सविस्तर यादी

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

ही 16 औषधं खरेदी करण्यासाठी आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज पडणार नाही पण यासाठी सरकारने अटही ठेवली आहे.

नवी दिल्ली, 27 मे : औषधांच्या दुकानात (Medical) मोजकीच औषधं (Medicine) डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळतात. बऱ्याच औषधांसाठी डॉक्टर्सचं प्रिस्क्रिप्शन लागतं. सध्या OTC औषधांसाठी कोणताही कायदा नाही. परंतु सरकार लवकरच नियमांमध्ये बदल करणार आहे. त्यानंतर डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय 16 औषधं खरेदी करणं शक्य होणार आहे.. सरकारने ओव्हर-द-काउंटर (OTC Medicine) कॅटेगरी सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स नियमांमध्ये बदल करावे लागणार आहेत. यानंतर डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काही औषधं खरेदी करणं शक्य होणार आहे (Medicine without Doctors Prescriptions). केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात एका अधिसूचनेचा मसुदा अर्थात ड्राफ्ट प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये 16 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पॅरासिटामॉल 500 एमजी, काही लेगेटिव्ह्ज, नेझल डिकन्जेस्टंट (Nasal Decongestant) आणि अँटीफंगल क्रीम (Antifungal Cream) यांचा समावेश आहे. मंत्रालयाने या प्रस्तावावर नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. एका महिन्यात यावर आपलं मत नोंदवता येणार आहे. सध्या औषधांच्या दुकानात अनेक औषधं डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध आहेत. परंतु, OTC औषधांसाठी कोणताही कायदा नाही. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मनीकंट्रोलला सांगितलं, की या वर्षाच्या सुरुवातीला ड्रग्ज टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी बोर्डाने (DTAB) OTC औषधांवरच्या सरकारच्या नवीन धोरणाला मान्यता दिली होती. DTAB ही औषधांच्या बाबतीत सरकारला सल्ला देणाऱ्या सर्वोच्च संस्थांपैकी एक आहे. हे वाचा - 23 वर्षे फक्त चिप्स आणि सँडवीच खात राहिली तरुणी; आता अशी अवस्था झाली की... एका अधिकाऱ्याने सांगितलं, की "यानंतर ओटीसी कॅटेगरीसाठी मंजूर औषधांवर विस्तृत चर्चा झाली. सुरुवातीला यामध्ये 16 औषधांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात या यादीचा विस्तार केला जाईल आणि आणखी औषधांचा त्यात समावेश केला जाईल.” ओटीसी कॅटेगरीत येणाऱ्या औषधांच्या वापरासाठी एक अट घालण्यात आली आहे. उपचाराचा कालावधी पाच दिवसांपेक्षा जास्त नसेल तरच ओटीसी श्रेणीतली औषधं औषधांच्या दुकानात या श्रेणीत विकली जातील, अशी अट आहे. तसंच, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजार किंवा समस्या संपत नसल्यास रुग्णाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. औषधांचा पॅक साइज (Medicine Pack Size) पाच दिवसांच्या औषधांपेक्षा जास्त नसावा आणि प्रत्येक पॅकवर रुग्णासाठी माहिती देणं आवश्यक असेल. हे वाचा - ऐकावं ते नवलंच! भविष्यात मशीन देणार बाळाला जन्म, शास्त्रज्ञांकडून कुत्रिम गर्भाशय विकसित मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार ऑल इंडिया ड्रग अ‍ॅक्शन नेटवर्कशी संबंधित तज्ज्ञ चिनू श्रीनिवासन म्हणाले, सध्या ओटीसी औषधांची व्याख्या ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अ‍ॅक्ट, 1940 किंवा ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स रुल्स 1945 मध्ये दिलेली नाही. तसंच ड्राफ्ट नोटिफिकेशन्समध्येही ओटीसीचा अर्थ दिलेला नाही. ओरल डिहायड्रेशनसारख्या नियमित औषधांचाही या यादीत समावेश नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 16 औषधांची यादी या औषधांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. ही औषधं डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करणं शक्य होऊ शकेल.
First published:

Tags: Health, Lifestyle, Medicine

पुढील बातम्या