मुंबई 18 जानेवारी : हिवाळ्यात लोक मटारची भाजी मोठ्याप्रमाणात खातात. कारण एकतर हा सिजन मटारचाच आहे त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात आणि स्वस्त मिळतात. तसेच हे सिझनमध्ये खाल्ले तर ते ताजे मिळतात. या मटाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसं की पोहे, पराठे, पुलाव, भाजी. तसे पाहाता ही भाजी खायला चविष्ट तर आहेच शिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे.
ही भाजी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही चांगली काम करते. पण त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे देखील हानिकारक आहे. त्यामुळे या भाजीला जास्त प्रमाणात खाणे टाळावे. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर केल्याने त्याचे दुष्परिणाम हे होतातच, तसंच या भाजीच्या बाबतीत देखील आहे.
हे ही वाचा : पपई कापताना तुम्हीही करता का या चुका? 'या' टिप्स तुमच्या फायद्याच्या
आता याचा तोटा काय आहेत हा प्रश्न उपस्थीत राहातो, तर ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास जास्त असतो. त्यांनी मटारचे सेवन कमी करावे. कारण आपले पोट मटार लवकर पचवू शकत नाही.
त्याचबरोबर ज्या लोकांना किडनीशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी देखील जास्त प्रमाणात मटार खाऊ नये, कारण यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे किडनीच्या कामात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशा लोकांनी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी मटारचे सेवन कमी करावे. या भाजीमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त आहे, जे तुमच्या शरीरावरील चरबी वाढवण्याचे काम करेल.
याशिवाय हिरवे वाटाणे जास्त युरिक ऍसिडमध्ये खाऊ नये. या भाजीमध्ये प्रथिने, एमिनो ऍसिड, व्हिटॅमिन डी आणि फायबर जास्त असते जे तुमच्या युरिकला चालना देण्याचे काम करते. त्यामुळे तुम्हाला हाडांशी संबंधीत प्रॉब्लम्स उद्भवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.