मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पपई कापताना तुम्हीही करता का या चुका? 'या' टिप्स तुमच्या फायद्याच्या

पपई कापताना तुम्हीही करता का या चुका? 'या' टिप्स तुमच्या फायद्याच्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पपई एक असं फळ आहे. जे तुम्हाला इतर आजारांपासून देखील लांब ठेवतं. त्यामुळे पपई एक फळच नाही तर औषध देखील आहे, असं मानायला काहीच हरकत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 15 जानेवारी : सध्या हिवाळा सुरु आहे आणि थंडी देखील बरीच वाढली आहे. यामुळे लोक आपल्या शरीराला गरम ठेवण्यासाठी पूर्ण कपडे तसेच, खाण्यावर देखील लक्ष देत आहेत. हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्यामुळे आपण ऋतुमानानुसार आजारांना बळी पडतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पपई हा एक प्रभावी उपाय आहे.

हो पपई एक असं फळ आहे. जे तुम्हाला इतर आजारांपासून देखील लांब ठेवतं. त्यामुळे पपई एक फळच नाही तर औषध देखील आहे, असं मानायला काहीच हरकत नाही.

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरसह अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आपल्याला मौसमी आजारांपासून वाचवतात.

हे ही पाहा : आता लहान मुलंही आवडीने खातील पालक, असा बनवा हेल्दी ब्रेकफास्ट

पपईमध्ये आढळणारे फायबर बद्धकोष्ठता आणि पोटदुखीसह अनेक समस्यांपासून आराम देते. पण पपई खरेदी करताना जेव्हाही तुम्ही बाजारात जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. जेणे करुन पपईचे योग्य ते फायदे शरीराला होतील.

पपई घेताना लक्षात ठेवा की, पपईवर डाग नसावेत आणि पपई अगदी ताजी असावी. पपई कुठूनतरी दाबली असेल तर ती विकत घेऊ नका. आपण बऱ्याचदा विचार करतो की आपण तो भाग कापून टाकू आणि उर्वरीत पपई खाऊ, पण असं करु नका.

पपई कापताना हे लक्षात ठेवा

पपई कापताना लक्षात ठेवा की खूप वेळापासून कापलेले पपई खाऊ नये. ही पपई शरीराला फायद्या ऐवजे नुकसानच पोहोचवते. पपईला अधिक रुचकर बनवण्यासाठी अनेक लोक त्यावर काळे मीठ, साखर, चाट मसाला किंवा लिंबाचा रस लावून खातात. परंतु लक्षात ठेवा की हे सारखं खाणं चांगलं नाही, तसेच मीठ लावून ठेवलेली पपई जास्त वेळ झाल्यानंतर टाकून द्या.

या आजारांवर होतो पपईचा फायदा

पपई हे एक मोसमी फळ आहे, जे बहुतेक हिवाळ्यात पाहायला मिळते आणि यामुळे हिवाळ्याच्या त्रासापासून आराम मिळतो. पोटाच्या समस्यांवर पपई एक रामबाण उपाय आहे. पपईच्या बियांचा वापर पावडर बनवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे पोटदुखी आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच पपई गरम असल्यामुळे हिवाळ्यात याचं सेवन चांगलं.

विवाहितांसाठी पपई वरदानापेक्षा कमी नाही. पपईमध्ये आर्जिनिन नावाचे संयुग असते जे रक्त परिसंचरण सुधारते आणि शिरा उघडण्याचे काम करते. यामुळे पुरुषांमधील इरेक्शन बरे होते. याशिवाय ते हृदयासाठी फायदेशीर ठरते.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Top trending