मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन कमी करण्यासाठी निडवताय शॉर्टकट? आरोग्यावर होऊ शकतो विपरीत परिणाम

वजन कमी करण्यासाठी निडवताय शॉर्टकट? आरोग्यावर होऊ शकतो विपरीत परिणाम

उपासमार आणि इतर पद्धतींद्वारे वजन लवकर कमी केल्याने अनेक दुष्परिणाम आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट निवडण्यापूर्वी या संभाव्य दुष्परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.

उपासमार आणि इतर पद्धतींद्वारे वजन लवकर कमी केल्याने अनेक दुष्परिणाम आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट निवडण्यापूर्वी या संभाव्य दुष्परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.

उपासमार आणि इतर पद्धतींद्वारे वजन लवकर कमी केल्याने अनेक दुष्परिणाम आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी कोणताही शॉर्टकट निवडण्यापूर्वी या संभाव्य दुष्परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे.

मुंबई, 19 जून : वजन कमी करणे (Loose Weight) आणि तंदुरुस्त राहणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र जर तुम्हाला अचानक शरीराच्या वजनात लक्षणीय घट दिसू लागली तर ते काही आरोग्य समस्या दर्शवू शकते. लवकर वजन कमी करण्यासाठी बरेच लोक वेगवेगळे मार्ग वापरतात जसे की डाएटिंग (Dieting), व्यायाम (Exercise) आणि मधूनमधून उपवास (Fasting). काही किलो वजन कमी करण्यासाठी जास्त व्यायाम करणे, कमी आहार घेणे आणि उपवास करणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही.

शिस्तबद्ध पद्धतीने वजन कमी करण्याच्या नियमानुसार हळूहळू कॅलरी बर्न (Burning Calories) करणे हा स्लिम आणि फिट राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तज्ञांच्या मते, उपाशी राहणे आणि इतर पद्धतींद्वारे खूप लवकर वजन कमी केल्याने अनेक दुष्परिणाम (Side Effect Of Quick Weight Loss) आणि आरोग्याच्या गंभीर समस्यादेखील निर्माण होऊ शकतात.

Hair Volume: गळतीमुळे केसांचा वॉल्यूम खूपच कमी झालाय? हे 3 सोपे उपाय घरच्या-घरी करून बघा

कमी वेळेत जास्त वजन कमी करण्याच्या प्रयत्नात तुम्हाला अनेक त्रासाचा सामान करावा लागू शकतो. ते खालीलप्रमाणे आहेत...

1. तुमची पचनक्रिया मंदावते

उपवास करून किंवा अपुरे अन्न घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो आणि पचनक्रिया मंदावते (Slows Down Metabolism). ज्यामुळे तुमचे शरीर बर्न करण्यास सक्षम असलेल्या कॅलरींची संख्या कमी होते. Healthifyme नुसार, जेव्हा एखादी व्यक्ती कमी कॅलरीज वापरून वजन कमी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा शरीराला दररोज 23% कमी कॅलरीज बर्न होतात.

Yoga Series Episode-3 : सुडौल बांधा आणि मजबूत हाडांसाठी 'ही' 2 आसनं नक्की करा, पहा VIDEO

2. तुमचे शरीर डिहायड्रेट होते

लवकर वजन कमी करण्यासाठी तुम्ही वापरात असलेल्या पर्यायांमुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. म्हणजेच तुम्हाला डिहायड्रेशन (Dehydration) होऊ शकते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अस्वस्थता, थकवा, बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि काही प्रकरणांमध्ये किडनी स्टोन सारखे दुष्परिणाम होतात. त्यामुळे आपले ध्येय साध्य करण्यासाठी योग्य मार्ग निवडणे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, केटोजेनिक आहार (Ketogenic Diet) वजन कमी करण्यास मदत करतो आणि ते तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाणही नियंत्रित ठेवते.

3. अशक्तपणा आणि थकवा

कॅलरी कमी करणे आरोग्यदायी नाही आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा आणि थकवा (Weakness And Fatigue) जाणवू शकतो. कमी कॅलरी वापरल्याने शरीराला दैनंदिन कामे रोजच्याप्रमाणे सहज करणे कठीण होते.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Monsoon, Weight loss