Home /News /mumbai /

Yoga Series Episode-3 : सुडौल बांधा आणि मजबूत हाडांसाठी 'ही' 2 आसनं नक्की करा, पहा VIDEO

Yoga Series Episode-3 : सुडौल बांधा आणि मजबूत हाडांसाठी 'ही' 2 आसनं नक्की करा, पहा VIDEO

गोमुखासना

'गोमुखासना' आणि 'कपोतासना' कसे कराल?

सुडौल बांधा आणि मजबूत हाडांसाठी अत्यंत उपयुक्त असणारी आणि सहज करता येणारी आसनं म्हणजे 'गोमुखासना' आणि 'कपोतासना' ही दोन आसनं आहेत. Yoga Day 2022 च्या निमित्ताने ही आसनं कशी करायची, ते VIDEO च्या माध्यमातून पहा.

    मुंबई, 19 जून : माणसांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगासनं (Yoga) अत्यंत महत्वाची आहेत. भारतात महर्षी पतंजली यांना योग पिता मानलं जातात. योगासने केल्यामुळे अनेक आजार, विकार बरे होतात. तसेच शरीरासाहित मनाचे स्वास्थ्य ही तितकेच महत्वाचे आहे. तन आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणूनच योगाचे महत्व हे फक्त भरतीयांनीच नाही तर परदेशीयांनी ही मान्य केले आहे. म्हणूनच 21 जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा केला जातो. आज आपण 'गोमुखासना' आणि 'कपोतासना' कसे करायचे (How to do Gomukhasana and Kapotasana?) आणि त्याचे फायदे काय आहे, त्याबद्दल जाणून घेऊ... वाचा : Yoga series Episode-1 : योगासने करण्यापूर्वी warm up exercise कसा कराल, पहा VIDEO योग सुरू करण्याअगोदर बॉडी वॉर्म अप कसे करायचे ते आपण आधीच्या भागात पाहिले आहेच. त्याचा आधार घेऊन तुम्ही सर्वप्रथम बॉडी वॉर्म अप करावे. गोमुखासना हे आसन अतिशय सोपे असून ते करायला फार वेळ लागत नसून कुठेही करता येऊ शकतं. गोमुखासना केल्याने तुमचे संधिवात, मधुमेह आणि कंबरदुखीवर बरे होऊ शकतात. तसेच शरीर सुडौल आणि लवचिक राहण्यास मदत होते. कपोतासना केल्याने ताणतणावर कमी होते. पचनक्रिया चांगली होते, त्यामुळे ही आसने दररोज केल्याने आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ...असे आहेत गोमुखासनाचे फायदे 1) महिलांनी आवर्जून करावे असे आसन 2) शरीरातील स्नायू आणि हाडं मजबूत होतात 3) मन शांत व एकाग्र राहण्यास मदत होते 4) नियमित केल्यास शरीर सुडौल आणि लवचिक बनते 5) संधिवात, मधुमेह आणि कंबरदुखीवर परिणामकारक आहे ...असे आहेत कपोतासनाचे फायदे 1) पचन समस्येवर लाभदायी आहे 2) फुप्फुसांना मजबूत बनवते 3) ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करते 4) ब्लडप्रेशर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे वाचा : Yoga series Episode-2 : पाठ दुखतेय आणि मनही शांत नाही, तर ‘ही’ 2 आसनं नक्की करा, पहा VIDEO योगासनाचा इतिहास काय आहे? योगाला 10 हजारांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे, जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद बृहद अरण्यक मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो. छान्दोग्य उपनिषदामध्ये प्रत्याहारचा तर बृहद अरण्यकमधील एका स्तवनामध्ये प्राणायामचा सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदमध्ये आहे, जी आयुर्वेदाच्या कथा शाखामधील अंतिम आठ वर्गांमध्ये पहिल्यांदा येते. जे मुख्य आणि अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Types of exercise, Yoga day

    पुढील बातम्या