मुंबई, 26 जून : केस घनदाट, मुलायम आणि काळे करण्यासाठी शिकाकाईचा वापर शतकानुशतके केला जात आहे. आपल्या आजी- आजोबांच्या काळापासून शिककाई केसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. केस स्वच्छ करण्यासाठी किंवा हेअर केअर मास्कमध्ये वापरत असाल तर केस सहज सुंदर आणि निरोगी बनवू शकता. शिककाईचा वापर करून आपण केसांना केमिकलच्या संपर्कात येण्यापासून तर वाचवालच पण केसांचा पोत सुधारण्यात यशस्वी व्हाल. आठवड्यातून एकदाही शिककाईचा वापर केल्यास केसांना त्याचा खूप फायदा होतो. आजही अनेक आयुर्वेदिक शाम्पू आणि साबणांमध्ये शिककाईचा वापर केला जातो. शिकाकाईमध्ये असलेले सॅपोनिन्स सहजपणे फेस तयार करतात, ज्यामुळे केस कोणत्याही साईड इफेक्टशिवाय स्वच्छ होऊ शकतात. जाणून घेऊया, केसांची काळजी घेण्यासाठी आपण याचा कसा वापर करू (Shikakai Hair Care) शकतो.
शिककाई शाम्पू म्हणून वापरा -
शिककाई बीन्स उन्हात वाळवून पावडर बनवा.
यासोबत तुम्ही आवळा आणि रीठा पावडर समान प्रमाणात मिसळा.
त्याची पेस्ट एक रात्र आधी तयार करा.
आता सकाळी शॅम्पूप्रमाणे केसांवर वापरा.
हे वाचा -
नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा
नंतर पाण्याने नीट धुवा.
केसांना मिळणारे फायदे -
केस काळे होतात.
शिककाई पाण्याने भरलेल्या लोखंडी भांड्यात रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी पाणी उकळून थंड होऊ द्या, याने केस धुवा.
हे वाचा -
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या
शिककाई पावडर कशी बनवायची -
100 ग्रॅम रीठा, 250 ग्रॅम मेथी, तुळस, 250 ग्रॅम मूग डाळ, ताजा कढीपत्ता आणि अर्धा किलो शिककाई घ्या. आता हे सर्व किमान एक दिवस उन्हात वाळवा. हे सर्व एकत्र करून त्याची पावडर बनवा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपले केस धुण्यासाठी वापरा. महिनाभर वापरायचे असेल तर हवाबंद डब्यात ठेवा.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.