Home /News /lifestyle /

नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा

नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा

नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा

नाक, तोंड नाही तर शरीराच्या 'या' अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा

श्वसन प्रणाली (Respiratory system) ही सर्वात नाजूक मानली जाते. कारण श्वसनात कोणत्याही कारणामुळे अडथळा निर्माण झाला तर प्रसंगी माणसाचा मृत्युदेखील होऊ शकतो. याच श्वसन प्रणालीच्या अनुषंगाने नुकतंच एक संशोधन करण्यात आलं.

मुंबई, 22 जून: मानवी शरीराची रचना वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. शरीरातल्या प्रत्येक अवयवाची (Organ) कार्यपद्धती असते. त्यामुळे एखादा अवयव दुखावला किंवा काही कारणांमुळे त्याच्या कार्यप्रणालीत अडथळा आला तर त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसतो. श्वसन प्रणाली (Respiratory system) ही सर्वात नाजूक मानली जाते. कारण श्वसनात कोणत्याही कारणामुळे अडथळा निर्माण झाला तर प्रसंगी माणसाचा मृत्युदेखील होऊ शकतो. याच श्वसन प्रणालीच्या अनुषंगाने नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत. माणूस गुदद्वाराने (Anus) देखील श्वास घेऊ शकतो, असं संशोधनातून दिसून आलं आहे. या संशोधनात कासव, डुक्कर आणि उंदराच्या शरीर रचनेचा अभ्यास करण्यात आला. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. मानवी श्वसन यंत्रणेबाबत नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. त्यात माणूस गुदद्वारानेही श्वास घेऊ शकतो, असं दिसून आलं आहे. हे संशोधन सायन्स डायरेक्टनं (Science Direct) केलं असून, ते MED जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. यासाठीच्या अभ्यासादरम्यान संशोधकांच्या एका पथकानं कासवांच्या (Tortoise) संथ चयापचय प्रक्रियेवर आधारित, तसंच डुक्कर (Pig) आणि उंदरांवर (Rat) अनेक प्रयोग केले. या प्रयोगांमधून ही अनोखी बाब समोर आली आहे. हेही वाचा - पावसळ्यातही उजळेल तेलकट चेहरा, 'या' सोप्या उपायांची करा अंमलबजावणी या अभ्यासादरम्यान, म्युकोसल लायनिंग (Mucosal Lining) अर्थात अस्तर पातळ करण्यासाठी प्राण्यांची आतडी स्वच्छ करण्यात आली. ज्यामुळे रक्तप्रवाहातील अडथळा कमी झाला. त्यानंतर जनावरांना ऑक्सिजन नसलेल्या खोलीत ठेवण्यात आलं. कासवांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट थरांमुळे ते त्यांच्या गुदद्वाराने श्वास घेऊ शकतात आणि यामुळे ते हिवाळ्यातही जिवंत राहू शकतात असं या संशोधनात लक्षात आलं. यात पुढं असं दिसून आलं की, ज्या प्राण्यांची आतडी स्वच्छ केली गेली होती आणि त्यांना दबावाखाली ऑक्सिजन (Oxygen) मिळाला, त्यापैकी 75 टक्के प्राणी एक तासापर्यंत जिवंत राहिले. यादरम्यान, ज्या प्राण्यांचा श्वास रोखून धरला गेला, त्यांची आतडी व्हेंटिलेशनपासून वंचित होती असे 11 प्राणी नंतर मृत्युमुखी पडले. या व्यतिरिक्त आतड्यांसंबंधी शुद्धीकरण न करता आतड्यांना व्हेंटिलेशन (Ventilation) मिळालेले प्राणी सुमारे 18 मिनिटांपर्यंत जिवंत राहिले. यावरून असं दिसून आलं की त्या ठिकाणाहून थोडा ऑक्सिजन आत घेतला जात होता. उंदीर आणि डुक्कर योग्य परिस्थितीत आतड्यांच्या माध्यमातून श्वास घेण्यास सक्षम आहेत, असं यावरून सिद्ध होतं. याचाच अर्थ गुदद्वाराने श्वास घेणंही शक्य असल्याचं सायन्स डायरेक्टनं केलेल्या एका संशोधनात दिसून आलं.
First published:

Tags: Science, Viral news

पुढील बातम्या