मुंबई, 08 सप्टेंबर : सुपरस्टार रजनिकांत (Rajinikanth) यांचा 'रोबो' चित्रपट (Robo Movie) तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असणारा रोबो. माणसांशी बोलणारा हा रोबो (Robot) अनेकांना भावला. पण प्रत्यक्षात खऱ्या आयुष्यात (Real Life) जर एखादा रोबो शाळेत (School) मुलांचा क्लास घेत असेल तर आश्चर्य वाटेल ना? मात्र, हे खरं असून, ‘शालू’ असं या रोबोचं (Shalu Robo) नाव आहे. शालू मॅडमचा क्लास हा मुलांना खूपच आवडत आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.
तुम्ही कधी विचार केला आहे का, जर तुमच्या मुलांचा शिक्षक हा रोबो असेल, तर काय होईल? हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे अगदी खरं आहे. सध्या एक रोबो मुंबईतल्या केंद्रीय विद्यालयात मुलांचा क्लास घेतो. ‘शालू’ असं त्याचं नाव असून, तो मुलांना सुद्धा खूप आवडतो. मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या या ‘शालू मॅडम’ची सर्वत्र चर्चा आहे.
हे ही वाचा : गाण्यासोबत जेवणालाही चव देतात आशाताई, खवय्यांसाठी जगभरात बांधले रेस्टॉरंट्स
शिक्षकाने तयार केला रोबो
47 भाषांमध्ये शिकवणारा शालू हा जगातील पहिला रोबो आहे. तो केंद्रीय विद्यालयातील शिक्षक दिनेश पटेल यांनी तयार केला असून, त्यासाठी त्यांना तब्बल 5 वर्षं लागली. पटेल हे शालूला आपली मुलगी मानतात. घरातील खराब आणि भंगार साहित्याचा वापर करुन त्यांनी हा रोबो तयार केला. त्यामुळे तो तयार करण्यासाठी आलेला खर्च जगातील कोणत्याही रोबोच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
भारतात बोलल्या जाणार्या 9 भाषांमध्ये शालू रोबो मुलांना शिकवू शकतो. तसंच तो 6 पेक्षा जास्त विषय मुलांना शिकवतो. याशिवाय, जगातील 38 भाषांमध्ये बोलू शकतो. वर्गामध्ये मुलांनी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तर देतो.
सध्या हा रोबो आयआयटी बॉम्बेच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांचा क्लास घेतो. विशेष म्हणजे, शालू मॅडमचा क्लास सुरू झाल्यापासून मुलांची अभ्यासाची आवड पूर्वीपेक्षा वाढली आहे. मुलं सांगतात की, त्यांना शालू मॅडमचा क्लास इतर शिक्षकांपेक्षा जास्त आवडतो, आणि या मॅडम त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काही सेकंदात देतात.
हे ही वाचा : अनन्या पांडेसोबत ब्रेकअपवर ईशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला...
दरम्यान, भारतात रोबोंच्या सहाय्याने वर्गात शिक्षण देण्याची पद्धत अजून सुरू झालेली नाही, पण जगातील अनेक देशांमध्ये वर्गात रोबोंच्या सहाय्याने शिकवलं जातं. येत्या काळात भारतातही रोबो स्कूल सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने शालू नावाचा रोबो हे मोठं पाऊल ठरू शकतं. विशेष म्हणजे, हा रोबो मुलांचा प्रिय शिक्षक बनल्याने, ही मुलांचाही अशा पद्धतीच्या शिक्षणाला प्रतिसाद मिळत असल्याची चिन्हं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Movie review, Mumbai, Rajnikant, Robot, Superstar rajnikant