मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Sexual wellness : शरीर कितीही गोरं असलं तरी गुप्तांगाची त्वचा काळी का असते?

Sexual wellness : शरीर कितीही गोरं असलं तरी गुप्तांगाची त्वचा काळी का असते?

फोटो सौजन्य - canva

फोटो सौजन्य - canva

प्रायव्हेट पार्ट (private parts) हे त्वचेच्या रंगापेक्षा थोडे डार्क असतात असं का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात वाचा.

प्रश्न : साधारणपणे माणसाच्या शरीरावरील त्वचेच्या तुलनेत त्याच्या गुप्तांगाची त्वचा काळी असते. माझे शरीर देखील गोरं असून माझ्या पेनिसची त्वचा काळी का आहे?

उत्तर : सर्वात आधी तुम्ही हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल तुमचं कौतुक वाटतं. खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीत आपण गोऱ्या रंगाला इतकं महत्त्व देतो की आपल्याला काळा किंवा सावळा रंग हा कुरूप वाटतो. आपल्या देशात रंगाला खूप महत्त्व दिलं जातं. यामुळे अनेकदा आपण गोरं नसल्यामुळे सुंदर नसल्याची भावना अनेकांच्या मनात तयार होते. याचबरोबर आपल्या गुप्तांगाचा रंग शरीराच्या रंगापेक्षा वेगळा असल्याने त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. ते आपल्या पार्टनरला घृणास्पद वाटेल यामुळे ते गुप्तांग दाखवायला घाबरतात. महत्त्वाचं म्हणजे गुप्तांग, काख आणि मांड्यांमध्ये रंग काळा असणं हे सर्वसामान्य आहे.

जननेंद्रियाचा(Genitals) रंग वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा असतो. सामान्यत: भारतीयांमध्ये गुप्तांग जास्त गडद असतात. हे अनुवांशिक आहे. त्यामुळे तुमच्या बाकीच्या शरीराचा रंग गोरा आणि गुप्तांगाचा रंग काळा असेल तर त्याने काहीही फरक पडत नाही. भारतीय नागरिकांमध्ये गुप्तांगाची जागा ही काळ्या रंगाचीच असते. त्यामुळे यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही नसून हा काळा रंग म्हणजे अस्वच्छतेचं लक्षण नाही. ही फक्त सामान्य काळी त्वचा आहे.

हे वाचा - Sexual Wellness : मुलं वयात येताना त्यांच्या शरीरात काय बदल होतात?

अनेकदा बॉलिवूड कलाकार किंवा पॉर्न मूव्हीमध्ये काम करणारे या ठिकाणी मेकअप करून ती जागा गोरी किंवा शरीराच्या रंगाच्या बनवतात किंवा अनुवंशिकतेने त्यांच्या शरीराचा आणि गुप्तांगाचा (Genitals) रंग सारखा असतो. विविध भागांमध्ये आणि देशांमध्ये त्वचेचा रंग वेगळा असणे सर्वसाधारण आहे.

भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गुप्तांगाचा (Genitals) रंग बदलण्याचे ऑपरेशन होताना दिसून येतं. ही खूप किचकट आणि अवघड प्रक्रिया आहे. यामध्ये विविध प्रकारच्या मेडिकल प्रक्रिया आणि लोशन वापरून गुप्तांगाची त्वचा चमकवली म्हणजेच गोरी केली जाते. पण दीर्घकाळचा विचार केल्यास गुप्तांगाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे चिडचिड, संवेदनशीलता कमी होणं, फोड येणं, लालसरपणा, ज्वलन आणि गुप्तांगांना कायमस्वरूपी डाग येऊ शकतात. हे 'फेअरनेस' क्रीम्स आणि त्वचेच्या उत्पादनांइतकेच आक्षेपार्ह, वर्णद्वेषी आणि भयंकर आहे.

हे वाचा - 'लठ्ठपणामुळे जोडीदारासमोर निर्वस्त्र होताना लाज वाटते; हा न्यूनगंड कसा दूर करू?'

गुप्तांगाचा (Genitals) रंग काळा असणं भारतीयांसाठी एक सामान्य वैशिष्ट्य आहे. तुम्ही जसे आहात तसेच खूप सुंदर आहात. याचबरोबर आपल्या शरीरावरील विविध रंगाचा अभिमान बाळगा.

First published:
top videos

    Tags: Sexual wellness