मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Sexual Wellness : मुलं वयात येताना त्यांच्या शरीरात काय बदल होतात?

Sexual Wellness : मुलं वयात येताना त्यांच्या शरीरात काय बदल होतात?

मुली (puberty) वयात येताना त्यांच्यात काय काय शारीरिक बदल होतात याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध आहे. पण मुलांबाबत फारशी माहिती नाही. याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

मुली (puberty) वयात येताना त्यांच्यात काय काय शारीरिक बदल होतात याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध आहे. पण मुलांबाबत फारशी माहिती नाही. याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

मुली (puberty) वयात येताना त्यांच्यात काय काय शारीरिक बदल होतात याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध आहे. पण मुलांबाबत फारशी माहिती नाही. याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

प्रश्न : मुली वयात ( Puberty) येताना कोणकोणते शारीरिक बदल होतात याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध आहे. पण मुलं वयात येताना कोणकोणते शारीरिक बदल घडतात याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसते. ते बदल कोणते?

उत्तर : खरं तर मुली वयात (Puberty) येताना कोणकोणते शारीरिक बदल होतात याची पुरेशी माहिती उपलब्ध आहे. परंतु मुलांच्या बाबतीत ही माहिती पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. वयात येणं म्हणजे मुलगा प्रौढ होण्याकडे वाटचाल करतो. या कालखंडात त्याच्या शरीरामध्ये विविध बदल होत असतात. सर्वसाधारणपणे याची सर्व लक्षणं समानच आहेत. परंतु काही मुलांमध्ये ती तीव्र देखील असू शकतात. सामान्यपणे मुले 12 ते 14 वर्षांची झाल्यानंतर त्यांच्यात ही लक्षणे दिसू लागतात. यामध्ये प्रथम दिसून येणारी सर्वसामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.

1) खासगी जागेत केस उगवू लागतात.

2) अंडकोशांची(Testicles)वाढ होण्यास सुरुवात होते.

3) अंडाशयाची( Scrotum) पिशवी प्रसरण पावून मोठी होते.

याचबरोबर या वयात ही लक्षणे आढळून आल्यानंतर पुढील 4 ते 5 वर्ष विविध प्रकारचे शारीरिक बदल होत जातात. या कालावधीमध्ये होणारे शारीरिक बदल पुढीलप्रमाणे

1) खासगी भागातील केस मोठ्या प्रमाणात वाढून कुरळे होणे.

2) लिंगाची(Penis) लांबी वाढून अंडाशयाचा आकार मोठा होणे.

3) काखांमध्ये केस येणं.

4) आवाजामध्ये बदल होणं. या कालावधीत मुलांच्या आवाजात बदल होऊन तो कधी खोल तर कधी वर जाणवायला लागतो त्याला बोली भाषेत आवाज फुटणं म्हणतात.

5) चेहऱ्यावर पुरळ (Acne) येणं.

6) चेहऱ्यावरील केस म्हणजेच दाढी-मिशी येणं.

7) शरीरामध्ये वाढ होण्याबरोबरच तब्येतीत देखील वाढ होते. या कालावधीत मुलांच्या शरीरात 7 ते 8 सेंटिमीटरने वाढ होते आणि ताकद देखील वाढते.

8) रात्री कामुक स्वप्न पडणे किंवा झोपेत शीघ्र पतन (Early fall) होणं.

हे वाचा - Sexual Wellness : सेक्सशिवाय मनुष्य जगूच शकत नाही, असं काही आहे का?

साधारणपणे 4 ते 5 वर्षांनंतर मुलं 18 वर्षाची होतात. त्याच्या एकंदर शरीरयष्टीवरून आणि त्यांच्या वागण्यातून ते वयात आले आहेत याचा अंदाज येतो. याचबरोबर शरीरावरील विविध भागावरील केसांची वाढ आणि दाढीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि दाढी मिशीचे केस राट होतात. या कालावधीत पालकांनी देखील आपल्या मुलांवर लक्ष देण्याची गरज आहे. या वयात मुले नवीन विश्वात पाय ठेवत असतात. याचबरोबर त्यांची भूमिका देखील बदलते. या कालावधीत अनेक मुले चिडचिड करतात, (anger issues) भीती(anxiety)आणि डिप्रेशन(Depression) यांसारखे विविध लक्षणे त्यांच्यात  आढळून येतील. या कालावधीत पालकांनी आपल्या मुलांना मानसिक आधार देणे खूप गरजेचे आहे.

हे वाचा - Sexual Wellness : 'आजही भारतीय समाजात Premarital sex का स्वीकारलं जात नाही?'

या सर्व बदलांबद्दल ही सर्व सर्वसामान्य लक्षणे असून यामध्ये काही वेगळेपण आढळल्यास तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

First published:

Tags: Sexual wellness