Home /News /lifestyle /

'मुलांच्या लैंगिकतेबाबत सांगण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं पालकांना का वाटतं?'

'मुलांच्या लैंगिकतेबाबत सांगण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं पालकांना का वाटतं?'

तुमच्या मनातील अशाच काही प्रश्नांची sexual wellness तज्ज्ञांनी दिलेली उत्तरं

प्रश्न : आमच्या लैंगिकतेबाबत पालकांना काही सांगण्याचा अधिकार आहे, असं त्यांना का वाटतं? उत्तर : सर्वच नाही, पण बहुतेक भारतीय पालक असं करतात हे सर्वात आधी नमूद करून मी चर्चेला सुरुवात करते. कारण हे आपल्या कुटुंबसंस्थेमुळे आहे. याकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहायला हवं. नाही तर या समस्येवर उपाय निघू शकत नाही. भिन्नलिंगी लैंगिक जीवन हेच केवळ स्वीकारार्ह आहे. केवळ विवाह हेच प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आणि सेक्सला परवानगी देणारं माध्यम आहे. या मुद्द्यांकडे नेहमीच वैयक्तिक दृष्टिकोनातून किंवा सामान्य अर्थाने पाहिलं जाऊ नये. मुलांच्या लैंगिकतेबाबत काही सांगण्याचा अधिकार आहे, असं अनेक पालकांना वाटतं. कारण पालक हे समाजातील एक घटक आहेत आणि त्यांचं पालनपोषण साचेबद्ध आणि पारंपरिक विचारांच्या कुटुंबात झालेलं असतं. पारंपरिक कौटुंबिक रचनेत स्वातंत्र्य आणि स्वीकृती या कल्पना अगदीच निसरड्या असतात. पालकांच्या त्यांच्या मुलांच्या लैंगिकतेबाबतच्या कल्पना लवचिक नसतात. कारण आपल्या मुलांनाही आपल्याप्रमाणेच समाजात स्वीकारलं गेलं पाहिजे, असं त्यांना वाटत असतं. पारंपरिक सामाजिक नियमांनी समाजातल्या नागरिकांसाठी सुरक्षिततेच्या जाळ्याप्रमाणे काम केलं आहे. त्यामुळे त्यास निर्विवादपणे समर्थन दिलं जातं. पण जसा काळ बदलत आहे आणि आपल्या जीवनशैलीत बदल होत आहे, तसतसं सामाजिक नियमांमध्येही परिवर्तन होत आहे. हे वाचा - Sexual Wellness : मुलं तरुण होताना त्यांच्यात काय बदल जाणवतात? उदाहरणार्थ, ज्या जोडप्याचं लग्न झालं आहे, परंतु त्यांना परस्परांपासून आनंद मिळत नाही, अशी जाणीव होते, त्या वेळी ते आताच्या काळात सामंजस्याने वेगळे होऊ शकतात. आपण एकमेकांना सुसंगत आहोत का याची चाचपणी करण्यासाठी जोडपी विवाहापूर्वीदेखील एकत्र राहू शकतात. एखाद्या स्त्रीला लग्न न करता मूल दत्तक घ्यायचं असेल आणि पालक म्हणून सर्व जबाबदारी पार पाडण्यास सक्षम असेल तर तिला सिंगल पॅरेंट होण्याचा हक्क आहे. प्रेम हे प्रेम असतं, मग ते समलिंगी असो वा भिन्नलिंगी. सध्या सिंगल पॅरेंट, समलिंगी कुटुंब, लिव्ह-इन रिलेशनशिप, बॅचलर्स अशा नवीन कौटुंबिक संरचना विकसित होत आहेत. लैंगिकतेवर निर्बंध घालणाऱ्या सामाजिक नियमांच्या मुद्द्यावर तुम्ही गांभीर्याने विचार करू इच्छित असाल, तर या मुद्द्यांचा दूर राहून विचार करा. पालकांना पाल्यासाठी सर्वोत्कृष्ट गोष्टी हव्या असतात. अर्थात प्रचलित सामाजिक नियमांनुसारच ते चालत असतात. तुम्हाला त्यांची भूमिका पटत नसेल, तर त्यांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करा. ते शक्य नसेल तर समान विचारांच्या व्यक्तींचे गट, सोशल ग्रुप्स अशा ठिकाणी तुम्ही या मुद्द्यांवर चर्चा करू शकता, मदत मिळवू शकता. हे वाचा - Sexual Wellness : Ex पार्टनरसोबत सेक्स करण्याची इच्छा का होते? दुसरी बाजू अशी आहे की, बऱ्याच पालकांना आपल्या पाल्याला अशा बाबतीत स्वातंत्र्य मिळावं असंही वाटत असतं. लग्नाआधीही मुलांना जोडीदारासोबत राहता यावं, मनानुसार समलिंगी किंवा भिन्नलिंगी जोडीदार निवडता यावा, स्वतःची हवी ती लैंगिक ओळख तयार करता यायला हवी, असं काही पालकांना वाटतं; पण सामाजिक उपहास किंवा नकारात्मकता टाळण्यासाठी बऱ्याच पालकांना मुलांकडून लैंगिकतेबाबत एक आदर्श आणि स्वीकारार्ह अभिव्यक्तीच अपेक्षित असते. हा खूप गुंतागुंतीचा मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांमध्ये अडकण्याऐवजी अशा गोष्टींबाबत समीक्षात्मक विचार करणं अधिक चांगलं आहे.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या