प्रश्न : पल्लवी, मला नेहमी एक प्रश्न पडतो. आपल्या तारुण्याविषयी आणि तारुण्यात प्रवेश करताना होणाऱ्या शारीरीक बदलांविषयी मुलींमध्ये चांगली माहिती असते. पण जेव्हा मुलं तारुण्यात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यात नेमके कसे, कोणते आणि काय बदल होतात? उत्तर : मुलं वयात आल्यावर त्यांच्या शरीरावरील केसांची वाढ होते. चेहऱ्यावर, छातीवर, काखेत तसेच हातापायावर केस येण्यास सुरुवात झाल्याचं सामान्यतः दिसून येतं. जेव्हा एखादी लहान मुलगी वयात येताना तिचे स्तन लक्ष वेधून घेतात, तेव्हा तिला जसं लाजल्यासारखं वाटतं, तसेच अचानक शरीरावरील केसांची वाढ झाल्यावर, चेहऱ्यावर मिशी येऊ लागल्यावर त्यावरून काही बोलल्यावर मुलंही लाजतात. शरीरात हार्मोनल चेंजस झाल्याने कधीकधी चेहऱ्यावर मुरुम येतात, पालकांनाही न समजणाऱ्या आक्रमकतेसारख्या भावना निर्माण होऊ लागतात. हे वाचा - ‘पहिल्या नजरेत नाही तर घट्ट मैत्री झाल्यानंतरच मी प्रेमात पडतो, असं का?’ तारुण्यात प्रवेश हा जसा मुलींसाठी काहीसा कठीण काळ असतो, तसाच तो मुलांसाठीही असतो. स्वतःच्या आवाजात झालेला बदलही मुलांना ऐकण्यास काहीसा विचित्र वाटतो. लहान असताना त्यांना त्यांच्या आवाजाची एक प्रकारे सवय झालेली असते. परंतु तारुण्यात प्रवेश करताना बदलेल्या आवाजाने त्यांना थोडंसं वेगळे आणि स्वतःपासूनच डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटू लागतं. काही मुलं त्यांच्या शरीरात झालेल्या अन्य बदलांप्रमाणे हा आवाज लपवण्याचा देखील प्रयत्न करतात. पण प्रत्येक जण तारुण्य वेगवेगळ्या प्रकारे अनुभवतो. हे वाचा - Sexual Wellness : Ex पार्टनरसोबत सेक्स करण्याची इच्छा का होते? काही मुले त्याच्या पौरुषत्वावर खूष असतात. परंतु आपल्या शरीरात झालेले बदल त्यांना गोंधळात टाकणारे असतात. या बदलाशी जुळवून घेणं त्यांना कठीण जातं. मुलींमध्ये जर स्नायूबदल होतात, तसेच ते मुलांमध्येही होतात. या कालावधीत बऱ्याच मुलांना आपल्या पेनिसला स्पर्श करावासा वाटतो. त्यामुळे ते हस्तमैथुनासारखा मार्ग शोधतात. काही मुलं स्वप्नांमध्येच रमतात. त्यातून पुन्हा सावरण्यासाठी त्यांना वेळ लागतो. हार्मोनल बदलांमुळे तारुण्यात येताना मुला-मुलींमध्ये आत्मसन्मानाचे मुद्दे आणि मनःस्थिती बदलणं या गोष्टी समान असतात. मुलाचा पुरुष म्हणून आणि मुलीचा स्त्री म्हणून प्रवास सुरु होताना या गोष्टींकडे एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








