Home /News /lifestyle /

Inter caste marriage : आंतरजातीय विवाहाविषयी तुमचं काय मत आहे?

Inter caste marriage : आंतरजातीय विवाहाविषयी तुमचं काय मत आहे?

आंतरजातीय विवाहाबाबत (inter caste marriage) तज्ज्ञ काय सांगतात ते पाहा.

प्रश्न : आंतरजातीय विवाहाविषयी तुमचं काय मत आहे? उत्तर : जर दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करत असतील आणि त्यांना लग्न करण्याची इच्छा असेल तर कोणत्याही मुक्त लोकशाही असलेल्या समाजाने त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पालन करण्याची परवानगी दिली पाहिजे. जर ते दोघं वेगवेगळ्या जातीतील असतील, पण आपण एकमेकांसाठी सुसंगत आहोत, आपले एकमेकांवर प्रेम आहे आणि एकमेकांविषयी आदर आहे असं त्यांना वाटत असेल तर त्यांच्या विवाहबंधनाला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. आपल्या भारतीय समाजात जात ही एक अडचण आहे, हे आपण सर्वजण मान्य करू शकतो. आजूबाजूचा परिसर, शाळा असो किंवा विद्यापीठ असो यासह अनेक ठिकाणी दररोज कोट्यवधी भारतीय जातीआधारित अन्याय आणि हिंसाचार सहन करतात. आपल्या जन्मापासून मृत्यूविधीपर्यंत संस्कृतीच्या प्रत्येक घटकात आपल्यावर जबरदस्तीने अन्याय होण्याची ही सर्वात जुनी व्यवस्था आहे. आपल्याच जातीत विवाह करणं म्हणजे जातीय शुद्धता असं भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. पुरोगामी विचारसरणी, मुक्त विचारधारा असणाऱ्या आधुनिक भारतीयांनी आंतरजातीय विवाह करताना कोणताही संकोच करू नये, कारण ते स्वतःच्या जातीय संस्थेला आव्हान देण्याचं एक साधन आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाहाचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि हजारो वर्षांची जातीची दडपशाही मोडून काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे वाचा - पार्टनर चिट करतोय; एखादं डिव्हाइस वापरून पाळत ठेवणं योग्य आहे का? आपल्या सामाजिक वातावरणाविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला आंतरजातीय विवाहास प्राधान्य देण्यास हरकत नाही. जाती श्रेणीरचना ही एक कृत्रिम, सांस्कृतिक रचना आहे ती नैसर्गिक नाही. इतरांबद्दल प्रेम वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे दोन व्यक्ती स्थायिक होऊ इच्छित असतील तर त्यांनी धैर्याने विवाहाचा विचार नक्कीच केला पाहिजे. आपण उपस्थित केलेला हा विषय अतिशय योग्य आहे. हे वाचा - SEXUAL Wellness : देशातील वाढत्या बलात्कारांना थांबवायचं असेल तर काय आहे उपाय? देशभरात या विषयावर वादविवाद सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने 8 फेब्रुवारीला एक महत्वाचा निर्णय दिला आहे. हा निर्णय महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे. समाजाने आंतरजातीय आणि आंतरविश्वास विवाह स्वीकारणं अत्यावश्यक असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.
First published:

Tags: Sexual wellness

पुढील बातम्या