प्रश्न : तुमचा जोडीदार तुमची फसवणूक (Partner cheating) करतो आहे किंवा तुमच्याशी खोटं बोलतो आहे, असं वाटत असेल तर सत्य जाणून घेण्याकरिता ट्रॅकिंग किंवा ऑडिओ रेकॉर्ड डिव्हाईसचा वापर करणं चुकीचं आहे का? उत्तर : जर तुम्हाला अशा उपाययोजनांचा अवलंब करावा असं वाटतं तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं की तो तुमच्याशी खोटं बोलतो आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक संभाषण देखील करू शकत नाही. तर तुम्ही तुमच्या नात्याबद्दल पुन्हा विचार केला पाहिजे. जीवनातील कोणत्याही नात्यामध्ये विश्वास हा महत्त्वाचा घटक आहे. तुम्हाला नातेसंबंधात अगदी वैवाहिक जीवनातही गोपनीयतेचा हक्क आहे. जेव्हा तुम्ही एकत्र नसता तेव्हा स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुमचं अस्तित्व असतं. त्यामुळे तुम्ही ट्रॅकिंग/ ऑडिओ उपकरणांचा वापर करून आपल्या जोडीदाराची हेरगिरी करत असाल तर तुम्ही त्यांच्या हक्काचा अनादर करत आहात. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी तुम्ही त्यांना मोकळा श्वास घेण्याची परवानगी द्यावी. त्यांचं व्हिडीओ किंवा आडिओ रेकॉर्डिंग करणं ही अनैतिक बाब आहे. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही तुमची ऊर्जा आणि वेळ वाया घालवू नये. हे वाचा - मिठी मारणं ही लैंगिक प्रवृत्ती असते का? नेमका प्रश्न काय आहे हे जाणून घ्या, जोडीदाराला सांगा. विश्वासार्ह मुद्यांबाबत तुम्ही अग्रभागी असणं आवश्यक आहे. यासाठी जोडीदार तुम्हाला आत्मविश्वास देण्यासाठी सक्षम असणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुम्हाला हे नातं सुरक्षित वाटेल. तुम्ही कदाचित एक किंवा दोनदा ऑडिओ/ व्हिडीओ ट्रॅकिंग डिव्हाईस वापरू शकता. परंतु या गोष्टींचा वापर तुम्हाला कायमस्वरूपी करता येणार नाही, तथापि हे शक्य देखील नाही. त्यामुळे आपल्या जोडीदाराची हेरगिरी करण्याऐवजी त्याच्यावर विश्वास वाढवण्यावर काम करणं हाच विचार योग्य ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







