प्रश्न : आजकालची तरुण पिढी ते प्रेम करत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहपूर्व लैंगिक संबंध ठेवते. आपल्या भारतीय समाजात या गोष्टी अजूनही का स्वीकारल्या जात नाहीत? एखाद्या व्यक्तीने लैंगिक दुष्परिणामांची जबाबदारी स्वीकारून ते ठेवले तर इतरांना त्यांच्या लैंगिक संबंध ठेवण्यात अडचण का आहे?
उत्तर : हा खरं तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आजच्या समाजाला हा प्रश्न विचारण्याची खरंच गरज आहे. लैंगिक संबंध हे दोन व्यक्तींमधील खूप खासगी क्षण आहेत. यामुळे एखादा व्यक्ती यामध्ये समाज आणि इतर गोष्टींचा विचार करत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. ही खूपच खासगी गोष्ट असल्याने समाजाला यामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज नाही.
पण असं होतं याचं पहिलं प्रमुख कारण म्हणजे मुलगी लग्नाआधी व्हर्जिन हवी ही अपेक्षा. आपल्या समाजात खूप जुन्या काळापासून पत्नीनं आपल्या पतीसाठी आपली व्हर्जिनिटी जपून ठेवावी असं सांगितलं जातं. काही ठिकाणी पहिल्या रात्री बेडवर पांढरी चादर टाकून याची तपासणी देखील केली जाते. या चादरीवर रक्त लागलं तरच मुलगी व्हर्जिन आहे असं मानलं जातं. हे आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळतं.
विवाहपूर्व लैंगिक संबंधाचा निषेध करण्याचं आणखी एक कारण म्हणजे यहुदी-ख्रिश्चन विचारसरणी देखील असू शकते. यामध्ये शरीरसंबंध हे केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी केले जातात असं मानलं जातं. लैंगिक संबंध हे आनंद आणि समाधान मिळवण्यासाठी केले जातात हे निषिद्ध मानलं जातं. प्रजननासाठी लैंगिक संबंध महत्त्वाचे असल्याने पुरुषाच्या समाधानाला यामध्ये महत्त्व दिलं असून महिलेच्या समाधानाला यामध्ये तितकंसं महत्त्व दिलेलं नाही. त्यामुळे विवाहपूर्व लैंगिक संबंध हे निषिद्ध समजले जातात.
हे वाचा - 'पत्नीसह सेक्स करताना तिच्या मैत्रिणीबाबत विचार, Sexual Fantasy चुकीची आहे?'
तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या विवाहपूर्व लैंगिक संबंधांमधून जन्माला येणारी मुलं. या मुलांना काहीही भविष्य नसतं. अनेकदा वडिलांच्या संपत्तीमध्ये ही मुलं वाटेकरी होतात. त्याचबरोबर या मुलांची काळजी आणि त्यांचा सांभाळ देखील वडिलांकडून नीट केला जात नाही. आजही मोठ्या प्रमाणात हा प्रश्न अधांतरी असून अनेक महिला या मुलांची भीती दाखवून श्रीमंत व्यक्तींकडून पैसे उकळण्याचं देखील काम करतात.
याव्यतिरिक्त विवाहपूर्व लैंगिक संबंध स्वीकारणं म्हणजे पारंपारिक विवाहसंस्था आणि सिंगल पॅरेंटिंग या अनेक वर्षे चालत आलेल्या सामाजिक संस्थेला धक्का देणंही आहे. आपल्या समाजव्यवस्थेत पुरुष हा कमवता आणि महिला ही घरकाम आणि घरची जबाबदारी सांभाळणारी असं मानलं जातं. यामुळे या परंपरेला आणि व्यवस्थेला धोका पोहोचणार आहे. त्यामुळेही समाज विवाहपूर्व लैंगिक संबंध स्वीकारत नसावा. याचबरोबर दीर्घकाळापासून ही एकत्र कौटुंबिक रचना ही सामाजिक धोरण, कल्याण आणि धार्मिक संघटनेचा कणा आहे. या सर्व संस्थांना विवाहपूर्व लैंगिक संबंधांमुळे धोका निर्माण होणार आहे. या काही महत्त्वाच्या कारणांमुळे आजही आपल्या समाजात विवाहपूर्व लैंगिक संबंध हे निषिद्ध मानले जातात.
हे वाचा - 'मला बायकोमध्ये आता रस वाटत नाही, Extra Marital Affair साठी मन खुणावतं'
आणखी काही काळाने आणि अभ्यास झाल्यानंतर लोकांची ही धारणा आणि पूर्वग्रह कमी झाल्याचे आपल्याला दिसून येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.