प्रश्न : माझ्यापेक्षा जास्त लैंगिक इच्छा असणाऱ्या महिलेशी मी आठ वर्षांपूर्वी लग्न केलं. मागील वर्षी आम्ही ओपन मॅरेज या संकल्पनेचा स्वीकार केला असून आमच्या मित्रमैत्रिणींशी आम्ही लैंगिक विषयावर खुलेपणानं चर्चा करायला सुरुवात केली. यादरम्यान माझ्या पत्नीला तिच्या इच्छेनुरूप पार्टनर मिळाला असून ती त्याच्याकडे आकर्षित झाली आहे. त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास ती इच्छुक आहे पण त्याला भेटण्यास संकोच करते. मला काय वाटेल हा विचार करून ती पुढाकार घेत नाही. आमच्या वैवाहिक जीवनात ती सुखी नसल्याचं मला वाटत आहे. मी काय करावं?
उत्तर : दोघांनीही सामान लैंगिक आयुष्य जगलं पाहिजे या तुमच्या दोघांच्या भूमिकेविषयी जाणून मला आनंद वाटला. तुमच्या या समस्येला विविध पैलू आहेत. बहुतेक लोकांची कामेच्छा दोन वेगळ्या प्रकारात मोडते. पहिला प्रकार म्हणजे उत्स्फुर्त इच्छा. यामध्ये तुम्हाला दिवसातून अनेकदा लैंगिक उत्तेजना होते. याचबरोबर सतत लैंगिक विचार येतात. तर दुसरा प्रकार म्हणजे प्रतिसादात्मक इच्छा. यामध्ये आपल्याला शारीरिक उत्तेजना मिळण्याची गरज असते. अन्यथा दिवसभरात आपल्याला लैंगिक विचार देखील येत नाहीत. तुमची पत्नी यामध्ये उस्फुर्त इच्छेमध्ये मोडत असून सर्वात आधी तुम्ही या दोन्ही प्रकारच्या कामवासनांबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. पण हे पूर्ण निराकरण होऊ शकत नाही.
हे वाचा - 'पहिल्या नजरेत नाही तर घट्ट मैत्री झाल्यानंतरच मी प्रेमात पडतो, असं का?'
लग्नाच्या बाहेर शारीरिक संबंधांची सुरूवात करण्याबद्दल आपल्या पत्नीची चिंता बरोबर आहे. ओपन मॅरेजमध्ये या गोष्टी करणं खूप नकारात्मक आणि गुंतागुंत निर्माण करणार आहे. लैंगिक संबंध हे आपल्या भावनांशी जोडलेले असल्याने या एकपात्री जगात, वाढत्या भावनिक आसक्तीशिवाय लैंगिक संबंध अत्यंत विचित्र गोष्ट आहे. तुमच्या पत्नीबरोबर याविषयी बोलण्याआधी तुम्ही तुमची चौकट आखून ठेवा. लग्नामध्ये विश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये तुम्ही ती गमावणार नाही याची काळजी घ्या. यामध्ये तुम्हाला असुरक्षितपणा वाटू शकेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या भावनिक, अहंकारी आणि मानसिक सीमा स्पष्ट करून त्या नक्की करा. हे फार महत्त्वाचं आहे, आणि कृपया स्वतःशी प्रामाणिक रहा. नाहीतर आपण आपल्या पत्नीवर रागवू शकता. वैवाहिक आयुष्यात राग हे खूप मोठं विष आहे.
हे वाचा - 'बायको आणि विवाहित एक्स-गर्लफ्रेंड दोघींसोबतही रिलेशन ठेवायचं आहे; पण कसं?'
तुमच्या पत्नीबरोबर प्रामाणिक आणि खुलं संभाषण करा. यामध्ये तुमची भूमिका आणि निर्णय तिला स्पष्टपणे सांगा. याचबरोबर यावर तिचं मतदेखील विचारात घेऊन यावर तिची भूमिका काय हे हेदेखील जाणून घ्या. आपण तिला यासाठी प्रोत्साहित करण्यापूर्वी हे आपल्या कोणत्याही मूलभूत गरजा आणि गोष्टींना प्रभावित करणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही दोघंही एकमेकांशी अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असल्याचं दिसून येत आहे. यामुळं हा निर्णय पुढे नेल्यास भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.