प्रश्न : मी कुणाकडंही रोमँटिकपणे आकर्षित का होऊ शकत नाही ? एखाद्याशी चांगली मैत्री झाल्यानंतरच मी त्याच्या प्रेमात पडू शकतो. मी प्रेमात पडल्यानंतर त्याच्याविषयी खूप गंभीर होतो. इतर सामान्य व्यक्तींप्रमाणे प्रपोज का करू शकत नाही ?
उत्तर : तुम्हाला जे काही अनुभव येत आहेत ते अगदी सामान्य आहे. पूर्णपणे मैत्री झाल्यानंतरच प्रेमात पडणं हेदेखील एक सामान्य लक्षण आहे. सामान्यपणे सेक्शुअल ओरिएंटेशनमध्ये याला डेमिसेक्शुअॅलिटी (demisexuality) असं म्हणतात. उदाहरणार्थ, अनेकजण एखाद्या व्यक्तीला पाहिल्यास त्याकडे आकर्षित होतात किंवा त्याच्या प्रेमात पडतात. पण खरंतर हे प्रेम नसून एक प्रकारचं शारीरिक आकर्षण (Physical Attraction) आहे. याचप्रमाणे डेमिसेक्शुअॅलिटीमध्ये (demisexuality) एखाद्या व्यक्तीस ओळखल्याशिवाय आणि त्यांच्याशी भावनिक बंध जुळल्याशिवाय अशी भावना निर्माण होत नाही.
हे वाचा - पहिलं किस केल्यानंतर तो माझ्या मेसेजलाही रिप्लाय देत नाही, मी त्याला आवडत नाही?
हे वेगवेगळ्या मार्गांनी प्रकट होऊ शकते, उदाहरणार्थ, तुमचं वय वाढत असताना एखाद्या सेलिब्रिटीकडे तुम्ही आकर्षित होता. याचबरोबर एखाद्यावर तुम्हाला क्रश होतं. पण तुमच्याबाबतीत हे होत नसावं किंवा तुम्हाला ते लागू होत नसावं. यामुळेच तुम्हाला तुमच्या मित्रांबद्दल किंवा मैत्रिणींबद्दल आकर्षण वाटत नसावं आणि आपल्या वयाच्या इतरांप्रमाणेच हुक-अप किंवा डेटिंगची इच्छासुद्धा होत नसावी. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर फारसा परिणाम होणार नाही. पण तुम्ही हे अंगीभूत करून याचं निराकरण करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Demisexuality, Friendship, Love at first sight, Physical attraction, Romance, Sexual wellness