प्रश्न : मी एक 45 वर्षीय विवाहित यशस्वी आणि तंदुरुस्त व्यक्ती आहे. दरम्यानच्या काळात मी दोन सुंदर महिलांसोबत डेटिंग करत होतो. त्यापैकी एका महिलेसोबत माझं लग्न झालं आणि आता आम्हाला दोन मुलं आहेत. पण त्यानंतर माझ्या जुन्या गर्लफ्रेंडची आणि माझी भेट झाली. ती देखील एका मुलीची आई आहे. यावेळी आमच्यातील भावना पुन्हा जागृत झाल्या. आम्ही दोघंही लैंगिकदृष्टया समाधानी होतो. त्यानंतर ती माझ्यापासून गरोदर राहिली आता आम्हाला 12 वर्षांचा एक मुलगा आहे. हे सर्व गुपितच आहे, याची कुणालाही माहिती नाही. मी दोघींवरही तितकंच प्रेम करतो आणि माझ्या मुलांवरदेखील प्रेम करतो. पण ती माझ्यासोबत राहत नाही. त्यामुळे मी तिला आणि माझ्या मुलाला खूप मिस करतो. ती माझा आणि आमच्या नात्याचा आदर करते, ही बाब सर्वात महच्त्वाची आहे. मी तिला माझ्याबरोबर ठेवू शकत नाही आणि वैवाहिक संबंधदेखील तोडू शकत नाही. यावर मार्ग काय?
उत्तर : तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचा संदर्भ घेत मला असं वाटतं की दुसऱ्या विवाहित महिलेसोबतच्या संबंधात गेल्या 12 वर्षांत जे बदल झाले आहेत, त्यामुळे तिचं प्रेम आणि मूल तुमच्या आयुष्यात असावं अशी तुमची इच्छा आहे. कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या असं घडण्याची शक्यता फारच कमी आहे. adultery हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा नसला तरी घटस्फोटासाठी मात्र तो वैध ठरतो. त्यामुळे तुमचे हे संबंध उघड झाले तर तुमची पत्नी, तिचा जोडीदार किंवा दोघंही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतात. जर दोन्ही वैवाहित जीवन खंडित होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल तर अशा गोष्टी न करणंच शहाणपणाचं ठरेल.
हे वाचा - 'Casual sex नकोय तरी मन तिकडेच वळतंय; मनाला कसा आवर घालू'
मला असं वाटतं की, तुमच्यासाठी दोन पर्याय आहेत आणि त्यापैकी कोणताही एक निवडणं तुमच्या हातात आहे. यापैकी नैतिक बाब अशी आहे की तुम्ही तुमच्या पत्नीला तुमच्या अफेअरविषयी स्पष्टपणे सांगावं. आपण आपल्या जोडीदाराबरोबरही असं करण्यासाठी तिला प्रोत्साहित करावं. ही बाब तुमची जोडीदार समजू शकेल, अशी मला छोटीशी आशा आहे. पण सर्व संभाव्य गोष्टींमुळे आणि मुळात बेईमानीपणामुळे दोन्ही विवाह अडचणीत येतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या वैवाहिक जोडीदारासोबत खुलेपणाने नातेसंबंध पुन्हा सुरू करा. जर तुम्ही या व्यक्तीबरोबर उर्वरित जीवन व्यतीत करू इच्छित असाल तर त्यानुसार जाण्याचा मार्ग म्हणजे प्रामाणिकपणा हा आहे.
हे वाचा - 'पत्नीसह सेक्स करताना तिच्या मैत्रिणीबाबत विचार, Sexual Fantasy चुकीची आहे?'
नाहीतर त्याऐवजी तुमच्या पत्नीसोबत राहणं पसंत करू इच्छित असाल, तिच्याशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला अन्य जोडीदारासह मुलाशी संबंध तोडण्याचं वचन तिला द्यावं लागेल. हा एकच पर्याय मला दिसतो. ती त्यानंतर तुम्हाला दुसरं नातं ठेवू देते की नाही ही बाब पूर्णपणे तिच्यावर अवलंबून असेल. दोन्ही वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ न देता पुढे जाण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुम्ही जे 12 वर्षांपासून करत आहात ते तसंच सुरू ठेवा. खोटं बोलणं, फसवणूक अशीच सुरू ठेवून विवाहबाह्य संबंध गुप्त ठेवा. शेवटी पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व काही समान आहे पण तुम्ही तुमच्या अन्य जोडीदारासह इच्छित वेळ घालवू शकणार नाहीत. पण या संबंधात सर्व पक्ष (तुमची पत्नी आणि प्रियकराचा जोडीदार) जागरूक नसतात. तुम्ही प्रामाणिकपणे आणि उघडपणे दोन्ही नातेसंबंधांबद्दल सक्षम आहात, असं कोणतंही समाधान नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.